

Importance of Spiritual Knowledge in Modern Life
Sakal
डॉ. सचिन जैन (संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड)
आमचे एक मित्र अहमदाबाद येथे करिअरच्या पर्यायावर बोलते होते. त्यांना सहज कुणी प्रश्न विचारला की, ‘शैक्षणिक किंवा व्यावसायिक चाकोरीबद्ध वाटेशिवाय नवीन आपण काय पर्याय निवडू शकतो?’ त्यांनी तडक उत्तर दिले, ‘आध्यात्मिक.’ भारताला आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार समजले जाते. आपल्या नैसर्गिक संस्कृतीला प्राधान्य देत लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. महाकुंभमध्ये येणाऱ्या ‘नागा’ साधूंबद्दल की, ते काहीही पोशाख परिधान न करत अगदी कैलास पर्वतासारख्या ठिकाणी कुठल्याही ऋतूमध्ये परिस्थितीचे सहज चढून जातात. हिमाचल प्रदेश तसेच हिमालयात राहणारे साधू पातळ कपड्यांमध्ये अगदी शून्य तापमानातही ध्यान लावून बसतात. ही काही जादू नाही तर आध्यात्मिक आणि शरीराला केलेली सवय आहे.