

SSB Head Constable Recruitment 2026: सशस्त्र सीमा दलात 233 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
Sakal
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सशस्त्र सीमा दलात (SSB) हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत देशभरातील विविध विभागांमध्ये मिळून २३३ पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.