esakal | दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी, SSC मार्फत निघाल्या 25 हजार जागा
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_SSC

दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची मोठी संधी, SSC मार्फत निघाल्या 25 हजार जागा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

SSC Constable GD Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून (शनिवार, 17 जुलै 2021) सुरु झाली आहे. कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीच्या काळातही तब्बल 25 हजार 271 जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासांठी 22 हजार 424 तर महिला उमेदवारांसाठी 2847 जागा राखीव आहेत. काँस्टेबल (जीडी) ,केंद्रीय सशस्त्र पोलिस बल (CAPF), NIA, SAF आणि रायफल मॅन अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा -

उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 23 यादरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म 2/08/1998 ते 01/08/2003 यादरम्यान असावा.

कसा कराल अर्ज?

पात्र उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा -

अर्ज प्रक्रिया दिनांक - 17 जुलै 2021

अर्ज करण्याचीची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021

ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 2 सप्टेंबर 2021

शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2021

हेही वाचा: चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

निवड कशी केली जाणार? -

परीक्षा संगणकावर (सीबीटी) आधारित असेल. तसेच शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर रहावे लागेल.

परीक्षा शुल्क -

सामान्य वर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये असून महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच माजी सैनिक (ESM) या वर्गातील उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.

loading image