esakal | चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील चाकण येतून दुहेरी हत्याकांडची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला पळवून नेल्याच्या राग मनात ठेवून हॉटेल मालकाने नोकरासह दोघांचा खून केल्याचा प्रकार उघडकस आला आहे. या घटनेनंतर पुण्यातील चाकण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुलीलाही मारहाण करण्यात आली असून ती जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजविहीरे (ता.खेड) येथील एकवीस वर्षीय तरूणीला पळवून नेल्याच्या रागातून दोघा जणांचा खून करण्यात आला. करंजविहीरे येथे बाळू मरगज यांचे माणूसकी हॉटेल आहे. या हॉटेलजवळ वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर काम करणारे मजुर बाळू सिताराम गावडे (वय-26), राहूल दत्तात्रय गावडे ,वय-26, दोघेही रा. आसखेडखुर्द ,ता.खेड,जि.पुणे) यांना लाकडी दांडके, लोखंडी गज याने हॉटेलमध्ये आणून बेदम मारहाण करण्यात आली. हॉटेल मालक मरगज यांच्या मुलीला बाळू गावडे याने पळवून नेले होते. त्यानंतर त्यांचा मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेतला. त्यांना हॉटेलमध्ये आणून लाकडी काठ्या, लोखंडी गज याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, मुक्ता बाळू गावडे, आनंदा सिताराम जाधव, बाळू मरगज (हॉटेल मालक )यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हेही वाचा: नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

loading image