Govt Jobs: SSCकडून 40 हजार जागांसाठी निघाली बंपर भरती

SSC_Jobs
SSC_Jobs
Updated on

पुणे : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) जीडी कॉन्स्टेबल (GD Constable) पदासाठी बंपर भरती आयोजित केली आहे. २५ मार्च २०२१ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे ४० हजार पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

आवश्यक पात्रता - 
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा - 
इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ ते कमाल २३ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे.

आवश्यक तारखा -
- अर्ज भरण्यास सुरवात - २५ मार्च
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १० मे
- अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख - १० मे
- संगणक आधारित परीक्षेची तारीख - २ ते २५ ऑगस्ट

अर्जासाठीचे शुल्क (Fee) -
- सर्वसाधारण (Open), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस - १०० रुपये
- एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

निवड प्रक्रिया - 
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे.

वेतन -
एसएससी जीडी कॉन्स्टेबलला दरमहा २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. 

असा करा अर्ज -
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 

SSC GD Constable भरती अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com