दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार; अर्ज भरण्यासाठी कार्यक्रम जाहीर

Exam
ExamSakal Media
Updated on

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा (ssc hsc repeat exam) परीक्षांसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मंडळाकडून (education authorities) या दोन्ही परीक्षा पुढील काही महिन्यांत घेण्याचे नियोजन आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुरवणी परीक्षेला (exam) सामोरे जाण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी (student application) कार्यक्रम जाहीर केला आहे. दहावी बारावी फेरपरीक्षा जुलै ते ऑगस्ट या कालावधीत दरम्यान होतात, परंतु यंदाच्या परीक्षेतसंदर्भातील कार्यक्रम नंतर ठरवण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Exam
सेल्फी काढणं जीवावर बेतलं ; बोट उलटून एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

दहावी-बारावीच्या या पुरवणी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या, आयटीआयसंस्थेव्दारे श्रेय यांक न झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 11 ते 18 ऑगस्ट या कालावधीत विनाशुल्क अर्ज भरता येईल. तर विद्यार्थ्याना यासाठी आवश्यक असलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने 19 ऑगस्ट रोजी भरता येईल. तर विलंब शुल्कासह 23 ते 24 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येतील.

श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन-2021 मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची एक संधी या परीक्षेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तर नव्याने आवेदनपत्र भरणे अनिवार्य असेल असेही मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com