SSC, HSC Results : बारावीचा 10 तर, दहावीचा निकाल 20 जूनला; बोर्डाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ssc hsc result 2022 class 10 12 board results will be declaired on 20 and 10 June

बारावीचा 10 तर, दहावीचा निकाल 20 जूनला; बोर्डाची माहिती

पुणे : 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा निकाल (SSC, HSC Results) लवकरच लागणार असून या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर, बारावीचा 10 जूनला लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले जातात, यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हेाती. मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते.

हेही वाचा: शाहीनबाग अतिक्रमण प्रकरण : सुप्रीम कोर्टाचा याचिकांवर सुनावणीस नकार

Web Title: Ssc Hsc Result 2022 Class 10 12 Board Results Will Be Declaired On 20 And 10 June

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top