MSEB मध्ये नोकरीची संधी, 50 वर्षे वय असलेलेही करू शकतात अर्ज |Maharashtra State Power Generation Company Limited 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB JOB

MSEB मध्ये नोकरीची संधी, 50 वर्षे वय असलेलेही करू शकतात अर्ज

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे 50 वर्षे वय असलेलेही या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे असून अधिकृत वेबसाइट mahagenco.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता. सोबत या संदर्भात अधिकृत वेबसाइटवर संपुर्ण माहिती दिली आहे (state power generation company limited has opened applications for engineer posts)

रिक्त जागा तपशील
मुख्य अभियंता- 07 पदे
उपमुख्य अभियंता - 11 पदे
अधीक्षक अभियंता- 23 पदे

हेही वाचा: राज्यात यंदा १,३३८ नवी महाविद्यालये

शैक्षणिक पात्रता
मुख्य अभियंता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. 15 वर्षांचा कामाचा अनुभव.

उपमुख्य अभियंता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. 12 वर्षांचा अनुभव असावा.

अधीक्षक अभियंता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान या विषयात बी.टेक. 12 वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा: परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच; कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

वय पात्रता

मुख्य अभियंता पदासाठी - 50 वर्षे

उपमुख्य अभियंता पदासाठी - ४८ वर्षे

अधीक्षक अभियंता पदांसाठी -45 वर्षे

Web Title: State Power Generation Company Limited Has Opened Applications For Engineer Posts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top