

Student Entrepreneurship
sakal
अद्वैत कुर्लेकर-स्टार्टअप मेन्टॉर
‘उद्योजकतेचा प्रवास एकट्याने करायचा नसतो. योग्य लोकांशी जोडले गेल्यास तुमची वाटचाल अधिक सोपी आणि परिणामकारक होते.’
विद्यार्थी उद्योजकतेत कल्पना, धाडस आणि मेहनत याबरोबरच नेटवर्किंगही तितकंच महत्त्वाचं असतं. कॉलेजमधील मित्र, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी (अल्युमनी) हे तुमचे पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे संसाधन ठरतात. त्यांचा योग्य उपयोग केल्यास तुमच्या व्यवसायाला दिशा, आधार आणि संधी मिळू शकतात.
मित्रांचा उपयोग
मित्र हे तुमचे पहिले ग्राहक, सहकारी आणि अभिप्राय देणारे असतात.
ते तुमच्या कल्पनेवर प्रामाणिक मत देतात.
छोट्या प्रयोगात मदत करतात.
तुमच्या उपक्रमाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवतात. मित्रांमुळे तुम्हाला सुरवातीला आत्मविश्वास मिळतो आणि तुमच्या कल्पनेला पहिला आधार मिळतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे आणि ती म्हणजे फक्त मित्रांच्या मतांनी हुरळून जाऊ नका.