शिक्षण घेताना आपल्या उपयोगी येऊ शकतात केंद्र सरकारच्या या पाच शिष्यवृत्ती ! जाणून घ्या त्यांचे लाभ

Scholarship.
Scholarship.

सोलापूर : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत शाळा व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी अनेक शिष्यवृत्त्या दरवर्षी दिल्या जातात. या शिष्यवृत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. येथे शिक्षण मंत्रालयाच्या पाच महत्त्वपूर्ण शिष्यवृत्त्या आहेत, ज्या आपल्यासाठी शाळा ते महाविद्यालय / विद्यापीठासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला जाणून घ्या या शिष्यवृत्तींबाबत... 

1. केंद्रीय शिष्यवृत्ती योजना (सेंट्रल सेक्‍टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप) (सीएसएसएस) 
ही शिष्यवृत्ती महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून येणारे गुणवंत विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. 

दरवर्षी शिक्षण मंत्रालय या योजनेंतर्गत 82 हजार नवीन शिष्यवृत्ती देते. त्याअंतर्गत वर्षाकाठी 10 हजार ते 20 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर दरम्यान अर्ज मागविले जातात. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (National Scholarship Portal) र्त ऑनलाइन अर्ज करता येते. 

कोणाला मिळणार लाभ? 
ज्या विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, जे विद्यार्थी पूर्णवेळ कोर्स करीत आहेत, कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे. 

2. राष्ट्रीय साधने व गुणवत्ता शिष्यवृत्ती (National Means cum Merit Scholarship) 
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून येणारे गुणवंत विद्यार्थी आठव्या इयत्तेनंतर याचा लाभ घेऊ शकतात. दरवर्षी ही शिष्यवृत्ती देशभरातील एक लाख विद्यार्थ्यांना दिली जाते. प्रति विद्यार्थ्याला 12 हजार रुपये मिळतात. यासाठी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर दरम्यान अर्ज मागविले जातात. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे (एनएसपी) ऑनलाइन अर्ज करावा लागतो. 

कोणाला मिळणार लाभ? 
यासाठी विद्यार्थ्याला आठवीमध्ये किमान 55 टक्के गुण असले पाहिजेत. यासाठी निवड चाचणीत हजर होणेही आवश्‍यक आहे. कौटुंबिक उत्पन्न वर्षाकाठी 1.50 लाखापेक्षा जास्त नसावे. 

3. एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्ती (AICTE Pragati Scholarship) 
ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थिनींसाठी आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना मिळू शकतो. दरवर्षी अशी 5000 शिष्यवृत्ती सरकारकडून दिली जाते. त्याअंतर्गत लाभार्थीला वर्षाकाठी 50 हजार रुपये व इतर सुविधा मिळतात. त्यासाठी सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या कालावधीत अर्ज मागविले जातात. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. 

कोणाला मिळणार लाभ? 
जी विद्यार्थिनी प्रथम किंवा द्वितीय वर्षात तांत्रिक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम शिकत आहे, ज्यांना बारावीच्या आधारे पार्श्व प्रवेशाद्वारे त्या कोर्समध्ये प्रवेश मिळाला आहे अन्‌ ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख किंवा त्याहून कमी आहे. 

4. एआयसीटीई सक्षम शिष्यवृत्ती (AICTE Saksham Scholarship) 
विशेषत: सक्षम विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. विशेषत: सक्षम (Specially abled) आणि तांत्रिक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देण्यात येतो. त्याअंतर्गत प्रत्येक लाभार्थीस 50 हजार रुपये शिष्यवृत्ती व इतर सुविधा दिल्या जातात. सप्टेंबर ते ऑक्‍टोबर दरम्यान अर्ज मागविले जातात. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो. 

कोणाला मिळणार लाभ? 
जे विद्यार्थी कमीतकमी 40 टक्के अपंग आहेत, ज्यांनी एआयसीटीई संलग्न संस्थेत पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या लैटरल एंट्रीद्वारे पहिल्या वर्षात प्रवेश घेतला असेल अन्‌ कौटुंबिक उत्पन्न वार्षिक आठ लाख किंवा त्याहून कमी आहे. 

5. पंतप्रधान संशोधन फेलोशिप (पीएमआरएफ) 
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाच्या वृत्तीला चालना देण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते. सक्षम संस्थेत पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीएमआरएफ फेलोशिपचा लाभ मिळतो. तथापि, विद्यार्थ्यांना या फेलोशिपच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इतर पात्रता मिळवणे देखील आवश्‍यक आहे. त्याअंतर्गत दरमहा 80 हजार रुपये स्टायफंड दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com