शिष्यवृत्ती परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांचा लागला कस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship exam

दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला लाखो विद्यार्थी नोंदणी करतात.

शिष्यवृत्ती परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी विषयाचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांचा लागला कस

पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांचा कस लागला. दरम्यान, शहरातील ८० परीक्षा केंद्रांवर झालेल्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी इयत्ता पाचवीच्या ८५.७५ टक्के, तर इयत्ता आठवीच्या ८४.२५ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

दरवर्षी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला लाखो विद्यार्थी नोंदणी करतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे च्यावतीने पाचवी आणि आठवीची २० जुलैला राज्यभरात ही परीक्षा होणार होती. मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्याने ३१ जुलैला परीक्षा घेतली. शहरातून इयत्ता पाचवीचे ७ हजार ९५, तर आठवीचे ४ हजार २६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी इयत्ता पाचवीच्या ६ हजार ८६ मुलांनी परीक्षा दिली. १ हजार ११ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर आठवीच्या ३ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर ६७३ गैरहजर होते.

शिष्यवृत्ती परीक्षेवेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. दरम्यान, बहुसंख्य विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे पेपर तुलनेने सोपे गेले, तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे प्रश्‍न काहीसे कठीण गेले. परीक्षेसाठी शहरात ८० केंद्र संचालक, ५७८ पर्यवेक्षक आणि १५५ शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शिष्यवृत्ती परीक्षा

आकडे बोलतात

इयत्ता - पट नियमित - अतिरिक्त विद्यार्थी - हजर - गैरहजर - एकूण पट - टक्केवारी

पाचवी - ७ हजार ९५ - २ - ६ हजार ८६ - १ हजार ११ -७ हजार ९७ -८५.७५%

आठवी - ४ हजार २६१ - १४ - ३ हजार ६०२ - ६७३ - ४ हजार २७५-८४.२५ %

Web Title: Students Perform While Solving Intelligence Test Questions In The Scholarship Exam Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top