शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना का आवडतो कॅनडा? जाणून घ्या

Abroad Education
Abroad EducationAbroad Education

श्रीमंत घराचे मुलं शिक्षणासाठी विदेशात जात असतात. जणू हा नियमच झाला आहे. आपल्या देशातील शिक्षण चांगले नाही किंवा महागडे आहे, असा भाग नाही. मात्र, विदेशातील शिक्षणाची आवड अनेकांसाठी महत्त्वाची झाली आहे. यामुळेच की काय कॅनडा हे अनेक दशकांपासून परदेशी विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय अभ्यासाचे ठिकाण झाले आहे.

विशेषत: हे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र झाले आहे. दरवर्षी हजारो परदेशी विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. परदेशी विद्यार्थ्यांसाठी कॅनडा हे आवडते ठिकाण झाले आहे. चली तर जाणून घेऊया यामागील कारण...

Abroad Education
माझे नाव एवढे घेतले जाते की २४ तासांपैकी २ तास उचक्या लागतात

कमी खर्चात दर्जेदार शिक्षण

इतर देशांच्या तुलनेत परदेशी विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये अभ्यास आणि राहण्याचा खर्च कमी आहे. येथे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळते. अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशांमधील खासगी महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जेवढा खर्च येते, त्यापेक्षाही कमी खर्च कॅनडातील नामांकित विद्यापीठांमध्ये येतो.

शिष्यवृत्तीचा लाभ

कॅनडामध्ये अभ्यास करण्यासाठी गेल्यानंतर प्रसिद्ध विद्यापीठ व अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देखील मिळते. कॅनडातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणे हे भारतातील अनेक प्रसिद्ध महाविद्यालयांपेक्षाही स्वस्त आहे. अभ्यासासाठी लागणारा खर्च काढण्यासाठी विद्यार्थी पार्ट टाइम नोकरीही करू शकतो. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले तर त्यांना वर्क परमिट देखील मिळतो.

बहुसांस्कृतिक समिती

कॅनडामध्ये १५० हून अधिक देशांचे नागरिक राहतात. त्यांच्यासोबत राहून अनेक भाषा, संस्कृती शिकता येते. भारतातील लोकांचा तेथे विशेष आदर आहे. पंजाबी ही तिथली अधिकृत भाषाही आहे. येथे राहणे आणि डॉलर्समध्ये कमाई करणे हे आजचे वास्तव आहे.

Abroad Education
शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

भेदभाव नाही

कॅनडामध्ये वर्णद्वेषी हल्ले नगण्य आहेत. कॅनडा हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सर्व नागरिक सारखे असतात, असे येथील सरकारचे म्हणणे आहे. येथे श्रीमंत व्यक्तीने गरिबांशी भेदभाव केला तर सरकारकडून कारवाई केली जाते.

लवकर मिळते नागरिकत्व

कॅनडामध्ये शिक्षण घेणारे तीन ते चार वर्षांत कॅनडाचे कायमचे रहिवासी होऊ शकता. बाकीच्या देशांमध्ये १२ ते १५ वर्षे लागतात.

विद्यार्थी सहभाग कार्यक्रम

कॅनडामध्ये शिकू पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी फायदा म्हणजे विद्यार्थी भागीदारी कार्यक्रम. चाळीसहून अधिक कॅनेडियन महाविद्यालये या कार्यक्रमाशी जुळलेले आहेत. येथील कॉलेजमध्ये अर्ज केल्यानंतर व्हिसा सहज उपलब्ध होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com