MPSC Success : एमपीएससीत ‘सारथी’च्या १७५ विद्यार्थ्यांचे यश ; धाराशिव जिल्ह्यातील नऊ जण

सन २०२२ मध्ये झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ‘सारथी पुणे’मार्फत राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा प्रशिक्षण उपक्रमातील १७५ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
MPSC Success
MPSC Successsakal

धाराशिव : सन २०२२ मध्ये झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ‘सारथी पुणे’मार्फत राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा प्रशिक्षण उपक्रमातील १७५ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. यात धाराशिव जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी) मार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्ष्यित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती.

MPSC Success
Parbhani Loksabha Constituency : शक्तिप्रदर्शनाने संजय जाधवांचा अर्ज ; परभणीमध्ये मिरवणूक, महाविकास आघाडीतर्फे सभाही

यशस्वी १७५ विद्यार्थ्यांमधील १३ विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारीपदावर निवड झाली आहे. ९ विद्यार्थी पोलिस उपअधीक्षक पदावर, ८ विद्यार्थी तहसीलदारपदावर, ४ विद्यार्थी गटविकास अधिकारीपदावर, ४ विद्यार्थी शिक्षणाधिकारीपदावर, १९ विद्यार्थी सहायक आयुक्त राज्यकर पदासाठी अशा प्रकारे ७५ विद्यार्थ्यांची निवड वर्ग एकच्या पदासाठी व १०० विद्यार्थ्यांची निवड वर्ग दोनच्या पदांसाठी झाली आहे.

सारथी संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पुणे जिल्हा ३६, सोलापूर जिल्हा २२, अहमदनगर २१, सातारा १४, सांगली ११, धाराशिव ९, छत्रपती संभाजीनगर ८, बीड ८, कोल्हापूर ६, लातूर ६, बुलडाणा, नांदेड व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी ४, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतील प्रत्येकी ३, अमरावती, धुळे, जालना, मुंबई व रायगड जिल्ह्यांतील प्रत्येकी २ व अकोला, गडचिरोली, नागपूर, नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक विद्यार्थ्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा निवड यादीत नाव झळकले आहे.

सारथीमार्फत प्रायोजित विद्यार्थ्यांपैकी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा परीक्षा २०२० द्वारे ७० विद्यार्थी व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा २०२१ द्वारे १०३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे एकूण सारथीमार्फत प्रायोजित एकूण ३४८ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) द्वारे वर्ग एक व वर्ग दोन पदांसाठी निवड झाली आहे. सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भाप्रसे. सेनि.) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून देशाच्या विकासात आपला ठसा उमटावा, अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com