esakal | निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'; दुर्गम भागातील युवकाचा थक्क करणारा प्रवास I CA Exam
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Jambhale

सुनीलनं अकरावी, बारावीचं शिक्षण साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केलं.

Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : अक्षरगंध नसलेल्या, शाळेची पायरी न चढलेल्या आईवडिलांच्या मुलाने जिद्दीने परिस्थितीला तोंड देत ‘सीए’ होण्याची किमया साधली आहे. कित्येक समस्यांना तोंड देत दुर्गम भागातील युवकाचे हे यश प्रेरणादायी ठरणारे आहे.

सुनील जगन्नाथ जांभळे (Sunil Jambhale) या युवकाची ही कौतुकास्पद यशोगाथा. सातारा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांभळमुरे या गावचा तो रहिवासी. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. आई लक्ष्मी अन् वडील जगन्नाथ हे दोघेही निरक्षर. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते म्हशीपालन करत. सुनीलचे प्राथमिक शिक्षण हे पेट्री बंगला इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad School) झाले. माध्यमिक शिक्षण लगतच असलेल्या पेटेश्वरच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात झाले. बालपणापासूनच त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली. अभ्यासात वेगळी वाट चोखाळली.

हेही वाचा: BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी?

त्यानंतर अकरावी, बारावीचे शिक्षण त्याने साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातून पुरे केले. मग सुनीलने कामासाठी मुंबईची वाट धरली. तिथे परिस्थितीमुळे त्याला आपले शिक्षण बाहेरून पूर्ण करावे लागले. त्यातून तो मुंबई विद्यापीठातून (University of Mumbai) वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. भाऊ सचिन अन् भावजय अर्चना यांच्या प्रेरणेने त्याने ‘सीए’ होण्याचे स्वप्न बाळगले. पुढे मुंबईत ‘मणियार कॉमर्स क्लासेस’मधून सेल्फ स्टडी करत मोठ्या प्रयत्नाने, परिश्रमाने ते यशस्वी करून दाखविले. त्याच्या या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा: 'आरोग्य'साठी 570 परीक्षार्थी प्रतीक्षेत

शिक्षण घेत असताना नेहमीच अडचणी येत राहिल्या. मात्र, काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा ध्यास सुरवातीपासूनच होता. तो ‘सीए’च्या रूपाने पूर्णत्वास पोचला.

-सुनील जांभळे

loading image
go to top