esakal | BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी? I Political
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

मुंबईत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक पार पडली.

BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) अद्याप राजकीय पातळीवरून कोणतीच हालचाल झालेली नाही. पण, मुंबईत काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक पार पडली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) व शशीकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात सातारा-जावळीवरून सुरू असलेला वाद शांत करण्याचा प्रयत्न सभापती रामराजेंनी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे नेमकं कितपत खरं हे निवडणुकीदरम्यान स्पष्ट होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार आहे. पण, कच्च्या यादीतील खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातून पात्र ठरलेले ठरावांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय. त्यामुळे यावर न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत यादी प्रसिध्द करू नयेत, अशी सूचना न्यायालयाने केल्याने अंतिम मतदार यादी लटकलीय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही बैठक घेतलेली नाही. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच प्रमुख नेत्यांची बैठक होऊन आगामी रणनीती ठरविली जाणार होती. मात्र, रिझर्व्ह बँक व नाबार्डची नवीन नियमावली संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, तसेच इतर मतदारसंघातील विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल मुंबईत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

हेही वाचा: भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा झाली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊनच निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. तसेच राखीव व संस्था मतदारसंघाविषयीही चर्चा झाली. यामध्ये कोणाला कोणते मतदारसंघ हवे आहेत, याविषयी मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत जावळी सोसायटी मतदारसंघावरून शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक व आमदार शशीकांत शिंदे यांच्यात सुरू असलेला वादावर विशेष चर्चा झाली. यामध्ये सभापती रामराजेंनी मध्यस्ती करत शिवेंद्रसिंहराजे व शशीकांत शिंदे यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही शांत करत दोघांनी एकमेकांना सहकार्य करण्याविषयी सूचना केल्याचे समजते. सभापती रामराजेंच्या निवासस्थानी झालेली जिल्हा बँकेसंदर्भातील या बैठकीत बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. ही निवडणूक पक्ष बाजूला ठेऊन बिनविरोध करण्याकडे सर्वांच्या चर्चेचा कल राहिला आहे. त्यामुळे आता अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर दुसरी सर्व समावेश बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं'

loading image
go to top