दहावीत दोनवेळा इंग्रजी विषयात नापास झाले. मात्र, ते निराश झाले नाहीत. दहावीनंतर पाच वर्षे गावातील दूध डेअरीत सचिव म्हणून काम करत शिक्षण सुरू ठेवले.
-संतोष मिठारी
कोल्हापूर : शिक्षणाची आवड असेल, तर कितीही बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला तरी ते पूर्ण करण्याचे ध्येय स्वस्थ बसू देत नाही. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील शिपाई चंद्रकांत श्रीपती पाटील (Chandrakant Patil). त्यांनी शेती, घर आणि नोकरी सांभाळत वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी इतिहास विषयातून पीएच.डी. (Ph.D) ही ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली आहे.