नववर्षाचे स्वागत - जपानी स्टाईल! 

नववर्षाचे स्वागत - जपानी स्टाईल! 

ईजी या राज्यकर्त्यांनी पूर्वीची जपानी नवीन वर्ष साजरी करण्याची पद्धत बदलून १८७३पासून जपानमध्ये १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करायला सुरुवात केली. यावेळी जपानमधील प्रत्येक घरात त्यांचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. भातापासून एक पदार्थ बनवला जातो त्याला ‘मोची’ असे म्हणतात, हा थोडा गोड पदार्थ असतो. ओसेची नावाच्या एका रंगीत डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आणि सगळे जपानी लोक त्याचा आस्वाद घेतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घंटानाद 
जपानमध्ये अगणित बुद्ध मंदिरे आहेत. ३१ डिसेंबरला घराजवळच्या मंदिरात सगळे जण जातात. प्रत्येक मंदिरामध्ये १०८ वेळा घंटा वाजवली जाते. बौद्ध संस्कृतीमध्ये १०८ प्रकारच्या पापांचा उल्लेख आहे. जपानी लोकांचा असा विश्वास आहे, की घंटा वाजविण्यामुळे मागील वर्षातील त्यांच्या पापांपासून मुक्तता मिळू शकते. ३१ डिसेंबरला १०७ वेळा घंटा वाजवली जाते आणि रात्री १२ वाजल्यानंतर एकदा घंटा वाजवली जाते. 

पोस्टकार्ड 
जपानी पोस्ट ऑफिससाठी डिसेंबरचा शेवट आणि जानेवारीच्या सुरुवातीही अत्यंत व्यग्र वेळ असते. जपानमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टकार्ड पाठवण्याची प्रथा आहे आणि बहुतांश जपानी लोक पोस्टकार्ड पाठवतात. पोस्ट ऑफिस १ जानेवारीलाच हे पोस्टकार्डस पोहोचवण्याची हमी देते. पोस्टकार्डवर राशींचे चित्र असते. प्रत्येक वर्षी वेगळा प्राणी त्याचे प्रतिनिधित्व करतो, जसे २००८मध्ये उंदीर, २००९मध्ये बैल, २०१०मध्ये वाघ, २०११मध्ये ससा, २०१२मध्ये ड्रॅगन आणि २०१३मध्ये साप व यंदा २०२०मध्ये पुन्हा उंदीर! या पोस्टकार्डवर हाताने किंवा पेटिंगच्या ब्रश ने शुभेच्छा लिहिल्या जातात. 

ओतोसिदामा 
नवीन वर्षाच्या दिवशी जपानी लोकांची एक प्रथा ओतोसिदामा म्हणून ओळखली जाते, जेथे प्रौढ नातेवाईक मुलांना पैसे देतात. 

वेगवेगळे खेळ- 
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक खेळ खेळण्याची प्रथादेखील होती. यात हृत्सुकी, टकोज (पतंग उडणे), कोमा (स्पिनिंग टॉप), सुगोरोकू , फुकुवाराइ, आणि खारुता (जपानी कार्ड्स) हे खेळ असतात. सर्व कुटुंब एकत्र मिळून ते खेळतात. जपानमधील नॅशनल असोसिएशन फुटबॉल एलिमिनेशन स्पर्धेतील सम्राट चषक स्पर्धेचा अंतिम सामना नवीन वर्षाच्या दिवशी होतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यातील प्रचलित प्रकार दोन आहेत. 
१. कोतोशी मो योरोशिकु ओ-निगाई-शिमास 
२. (शिंन नेन)आकेमसीते ओ-मेदेतो -गोझईमास 

जपानला भारतासारखाच खूप जुना इतिहास आहे आणि त्यांची संकृतीही आपल्यासारखीच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com