सुनो एआय...!

माझ्या डोळ्यांसमोर एका क्षणात दहा वर्षांपूर्वीचं चित्र उभं राहिलं. सी.ए. निकालाचा तो दिवस...माझं नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत होतं.
Suni AI

Suni AI

sakal

Updated on

- सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

सी.ए. झालो म्हणतात... खरी कमाई माझ्या आईची...

माझं नाव घेतात सगळे... पण ही जीत तुझ्याचसाठी...

हे शब्द ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर एका क्षणात दहा वर्षांपूर्वीचं चित्र उभं राहिलं. सी.ए. निकालाचा तो दिवस...माझं नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत होतं.

घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाइकांचे फोन, मित्रांचे संदेश आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. त्या सगळ्या गोंधळात माझी नजर एका व्यक्तीकडे गेली होती ती म्हणजे माझी आई. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. कदाचित त्या अश्रूंमध्ये अनेक वर्षांची धावपळ, चिंता, प्रार्थना आणि त्याग दडला होता. त्या दिवशी मला तिच्यासाठी काहीतरी खास करायचं होतं. तिच्या संघर्षावर, तिच्या प्रेमावर आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर एक गाणं तयार करायचं होतं. परंतु एक अडचण होती. मी ना गीतकार, ना संगीतकार, ना गायक.

म्हणून तो विचार मनातच राहिला. काळ पुढे सरकत गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com