- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
आपण आज पर्यावरणीय संकटांच्या उंबरठ्यावर उभे आहोत, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी जगाला ग्रासले आहे. या संकटांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकास घडवण्यासाठी ‘ग्रीन करिअर्स’ ही एक नवी आणि अत्यावश्यक दिशा निर्माण झाली आहे. ग्रीन करिअर म्हणजे असे व्यवसाय किंवा क्षेत्र जे पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि टिकाऊ तंत्रज्ञान यावर आधारित आहेत.