
Latest Jobs: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमध्ये नुकत्याच झालेल्या नोकर कपातीवरुन मोठा विवाद उभा राहिला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार कंपनीने १२ हजार २०० कर्मचारी कमी केले आहेत. मात्र या आकड्यांवरुन प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. मॅनेजमेंट एक्स्पर्ट अँड कन्सल्टंट देविका गौतम यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन भलताच दावा केलाय.