
शिक्षणाबाबत छत्तीसगडमधून (Chhattisgarh) एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय.
वर्गात प्रश्न विचारते म्हणून टॉपर विद्यार्थिनीला बोर्डाच्या परीक्षेत केलं नापास
सध्या देशभरात शिक्षण क्षेत्राचा दर्जा ढासळत असताना, छत्तीसगडमधून (Chhattisgarh) एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. चपोरा गावातील हायस्कूलमध्ये (Chapora High School) ही घटना घडलीय. वर्गात वारंवार प्रश्न विचारत राहते म्हणून शिक्षिकेनं वर्गात अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनीला प्रायोगिक परीक्षेमध्ये गैरहजर म्हणून नोंद केलीय. मात्र, संपूर्ण परीक्षेमध्ये सदर विद्यार्थिनी उपस्थित होती.
दहावीच्या बोर्डाचा (10th Board Exam) निकाल लागल्यावर हा प्रकार समोर आला. तिला 68 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मात्र, प्रॅक्टिकल पेपरमध्ये गैरहजर नोंद केल्यानं तिला नापास असा निकाल देण्यात आलाय. मात्र, सदर विद्यार्थिनी वर्गात अव्वल आहे. चपोरातील उच्च माध्यमित शाळेत शिकणाऱ्या जयंती साहू (Jayanti Sahu) ही दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत बसली होती. इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही निकाल समोर आलाय. त्यामध्ये तिला गैरहजर राहिल्यानं तिचा नापास असा निकाल दिला गेला. हा निकाल जेव्हा विद्यार्थिनीनं पाहिला, तेव्हा तिला धक्काच बसला. तिनं गणिताच्या शिक्षिका प्रिया वाशिंग (Teacher Priya Washing) हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: Indian Army : कुपवाडच्या जवानाचं पश्चिम बंगालात निधन
दरम्यान, जयंतीच्या वडिलांनी शिक्षिकेसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून जयंतीच्या वडिलांना धक्काच बसला. शिक्षिकेनं सांगितलं की, तुमची मुलगी वर्षभर वर्गात खूप प्रश्न विचारते, त्याची शिक्षा म्हणून तिला प्रायोगिक परीक्षेपमध्ये अनुपस्थित अशी नोंद करण्यात आलीय. त्यानंतर त्यांनी रतनपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली असून रतनपूर ठाण्यामध्ये (Ratanpur Police Station) विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. जयंतीला या परीक्षेत 68 टक्के गुण मिळाले आहेत.
Web Title: Teacher Failed The Topper Student In The 10th Board Exam As She Asks Questions At School
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..