शिक्षक उमेदवारांनी रक्ताने लिहिले मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र!

शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी रक्ताने लिहिले मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र! जाणून घ्या प्रकरण
मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र
मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्रमुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र
Summary

शिक्षण विभागाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, पण उमेदवार आंदोलन संपवायला तयार नाहीत.

सोलापूर : शिक्षण विभागाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, पण उमेदवार आंदोलन संपवायला तयार नाहीत. सोमवारी 69 हजार शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. भरती परीक्षेतील पात्र उमेदवारांना 68 हजार 500 रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. इच्छामरणाचा आदेश देण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रपती आणि राज्यपालांनाही लिहिले आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र
UPSC करणार सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती!

वास्तविक, मूलभूत शिक्षण संचालनालयावर चार महिन्यांपासून उमेदवार आंदोलन करत आहेत. उमेदवारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे की, उमेदवार भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत चार महिन्यांपासून उपोषणाला बसले आहेत. आमची चूक माफ करून एक लाख 37 हजार 500 रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करावी. शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उमेदवारांनी पत्रात केला आहे.

हे पत्र मुख्यमंत्र्यांना फॅक्‍स आणि ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत आम्हाला फक्त लाठ्या आणि सहकाऱ्यांना तुरुंगवास मिळाला आहे. आमची पात्रता शिक्षक बनण्याची आहे, तुरुंगात टाकण्याची नाही. 68 हजार 500 शिक्षक भरतीतील रिक्त 22 हजार जागा 69 हजार भरतीला जोडण्यात याव्यात.

मुख्यमंत्री आदित्यनाथांना पत्र
इंडियन ऑईलमध्ये 1900 अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या पात्रता

उमेदवारांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. 39 उमेदवारांनी राष्ट्रपतींना तर 45 उमेदवारांनी राज्यपालांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. भरतीत न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषण करू, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता न केल्याने आणि पोलिसांनी लाठीमार केल्याने 61 उमेदवारांची तुरुंगात रवानगी झाल्याने उमेदवार संतप्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com