esakal | शिक्षकांसाठी उद्या वेबिनार : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले करणार मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले करणार मार्गदर्शन

शिक्षक दिनानिमित्त रविवारी दुपारी दोन वाजता शैक्षणिक आव्हाने आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे मार्गदर्शन करणार आहेत.

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले करणार मार्गदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सकाळ माध्यम समुहातील NIE (न्यूज पेपर इन एज्युकेशन) यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच सकाळ इंडिया फाउंडेशन अंतर्गत उद्या (रविवार, ५ सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्त विशेष वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी 'शैक्षणिक आव्हाने आणि तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर तंत्रस्नेही, प्रयोगशील व ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले झूमवर मोफत कार्यशाळा घेणार आहेत. उद्या दुपारी २ वाजता या वेबिनारला सुरुवात होईल.

रणजितसिंह डिसले यांना 'क्युआर कोड' च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांमधून युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. सोलापुर जिल्ह्यातील परितेवाडी या ग्रामीण भागात, जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना रणजितसिंह डिसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोगशील उपक्रम राबवत प्रभावी अध्यापन करता येते हे त्यांनी दाखवून दिले. आज सहजासहजी वापरल्या जाणाऱ्या (क्यूआर) कोडचा शालेय शिक्षणासाठी वापर करण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी रणजितसिंह डिसले यांनी प्रत्यक्षात राबवून उपक्रमाची सुरवात केली होती.

या वेबिनारच्या माध्यमातून खालील बाबींविषयी मार्गदर्शन होईल.

१. शिक्षकांपुढील भविष्यातील आव्हाने.

२. पारंपरिक अध्यापन पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार व वापर का आवशयक आहे.

३. तंत्रज्ञानात्मक व कौशल्याधिष्टित विषयांमध्ये विद्यार्थ्यांची गोडी कशी निर्माण करावी.

४. अध्यापनात नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर.

तसेच शैक्षणिक बाजूने इतर बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल.

वरील वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक किंवा QR कोड ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेलवर वेबिनारची झूम लिंक व पासकोड मिळेल. झूमची मर्यादा फुल झाल्यानंतर esakal Facebook Page वर वेबिनार लाईव्ह पाहता येईल.

वेबिनार लिंक :

https://www.sakalindiafoundation.com/webinar.php

loading image
go to top