नैतिक मूल्ये जपणारी शिक्षण पद्धती (आरती पाटील)

आरती पाटील
Wednesday, 18 December 2019

सर्व सोयीसुविधांयुक्त शाळेची इमारत

 • सुसज्ज संगणक लॅब
 • अत्याधुनिक ग्रंथालय
 • सायन्स लॅब
 • मॅथ्स लॅब
 • विविध इनडोअर गेम्स
 • प्रार्थना व मेडिटेशन हॉल
 • संगीत विभाग
 • ॲक्टििव्हटी रूम
 • जलतरण तलाव
 • कॅंटीन
 • सभागृह

विद्यार्थ्यांना एक प्रगल्भ नागरिक म्हणून घडवताना त्यात शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. याच तत्त्वावर आधारित उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी ‘साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल’ची स्थापना करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील यश अवलंबून असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमातून या देशाची एकात्मता अखंड राखणारी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणजेच साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल होय.

‘वास्तविक शिक्षण’ म्हणजे काय, याची लोकांना कल्पना नाही. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र, शिकलेल्यांचा, मानसिक विकास घडविण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. म्हणूनच मुलांचा मानसिक विकास व्हावा या उद्देशाने साधू वासवानी स्कूलमध्ये पुस्तकी शिक्षणाबरोबरच नैतिकतेचे धडे देण्यावर विशेष लक्ष दिले जाते.
मुलांमध्ये मूल्यांक व संस्कार घडविणे, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तीनही स्तरांतून मूल्यांच्या संस्कारांची प्रक्रिया पूर्ण करणे, ही मूल्ये मुलांनी सहजपणे आत्मसात करावीत अशी परिस्थिती व पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे.  

राष्ट्रीय विचारांच्या शिक्षणाद्वारे चारित्र्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविण्याचे पवित्र कार्य साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल गेली आठ वर्षे करीत आहे. दादा जे. पी. वासवानी यांनी या शाळेची स्थापना केली. शाळेच्या यशावर असंख्यांच्या नावांची मोहोर उमटलेली आहे. संस्थेच्या पायाभरणीत मुख्याध्यापिका आरती पाटील यांचेही योगदान मोठे आहे. ‘साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा उभारण्याचे स्वप्न ज्यांनी बघितले, ते दादा जे. पी. वासवानी. त्यांच्या मते, विद्यार्थी हा एक माणूस म्हणून स्वतः आधुनिक विचार करणारा असायला हवा. फक्त परीक्षार्थी नव्हे, तर चांगला माणूस घडविण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असणार आहे. शालेय शिक्षणाबरोबरच अनुभवातून मिळणारे शिक्षण, सामाजिक भान, व्यक्तिगत मूल्ये यांवरही भर दिला जातो.  

शाळेच्या दिवसाची सुरवात प्रार्थनेने होते. प्रार्थनेचे पवित्र ठिकाण म्हणजेच साधू वासवानी यांचे स्मारक असलेले सभागृह, म्हणजेच मेडिटेशन हॉल. तेथे प्रवेश करताच विद्यार्थी तसेच शिक्षकांना सकारात्मक ऊर्जाप्राप्ती होते. मंत्र, प्रार्थना आणि त्यानंतर नैतिक मूल्यांवर आधारित सांगण्यात येणाऱ्या गोष्टी व श्‍लोकांमुळे विद्यार्थ्यांमधील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. शाळेत पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग असून सुसज्ज सोयीसुविधा, प्रशस्त क्रीडांगण, अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणांना वाव मिळावा म्हणून बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, स्वीमिंग इ. खेळांसाठी योग्य सुविधा शाळेत आहेत. प्रशस्त जागा, आधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता, डेटा प्रोजेक्‍टरची सोय, योगशाळा, ग्रंथालय, ललित कलांसाठी केंद्र इत्यादी शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनुभवी व नावीन्यपूर्ण विचारसरणीचे उच्चशिक्षित शिक्षक आहेत. 

मुलांना स्वतंत्रपणे विचार करू देणे व त्यानुसार कृती करू देण्याचे स्वातंत्र्य देणे, त्यांना प्रोत्साहन देऊन मार्ग दाखविणे आणि उत्तमोत्तम विद्यार्थी राष्ट्राला देणे हेच या शाळेचे ध्येय आहे. 

विद्यार्थी हा एक माणूस म्हणून स्वत: आधुनिक विचार करणारा असायला हवा. फक्त परीक्षार्थी नव्हे तर चांगला माणूस घडविण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असणार आहे.
- आरती पाटील, मुख्याध्यापिका, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaching practices that uphold moral values Aarati Patil