पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) २०२५’ ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक पदासाठी होणाऱ्या या पात्रता परीक्षेचे ऑनलाइन अर्ज येत्या सोमवारपासून (ता. १५) भरता येणार आहेत.