पुणे - बहुप्रतीक्षेत असणाऱ्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २०२५’च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे. निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अधिकृत संकेतस्थळावर लवकरच माहिती देण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेने सांगितले आहे. परीक्षा परिषदेच्या या संदर्भातील परिपत्रकामुळे ‘टेट-२०२५’च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.