esakal | TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा होणार दहा ऑक्टोबरला
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam

TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा होणार दहा ऑक्टोबरला

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: TET Exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या १० ऑक्टोबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना तीन ते २५ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध असेल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी २०१३ पासून टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सहा वेळा टीईटी घेण्यात आली आहे. त्यामध्ये ८६ हजार २९८ उमेदवार टीईटी उत्तीर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २०१९ पासून टीईटी घेण्यात आलेली नाही. राज्य परीक्षा परीषदेने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये टीईटीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, कोरोनामुळे या परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा नऊ जुलैला परीक्षा घेण्याबाबत शासनाला पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्यात १० ऑक्टोबरला परीक्षा घेण्याबाबत परीक्षा परिषदेने पत्र जारी केले आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे कुठे लपून बसले? थोरातांचा चिमटा

वाढत्या रिक्त जागा
राज्यातील जिल्हा परिषदेच्या २७ हजार, माध्यमिकच्या अंदाजे १४ हजार अशा ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या जागा टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. शिक्षक पदासाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त उमेदवार टीईटी परीक्षेला बसतात. दोन वर्षांपासून टीईटी झाली नसल्याने यंदा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Corona Vaccination: लसीकरणावर आता सर्व्हर डाऊनचे संकट

असे आहे वेळापत्रक
- ३ ते २५ ऑगस्ट : ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्यासाठी कालावधी
- २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर : प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे
- १० ऑक्टोबर : सकाळी साडेदहा ते एक (पेपर -१), दुपारी दोन ते ४.३० (पेपर २)

loading image
go to top