शिक्षक पदासाठी अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या 'त्या' उमेदवारांना धाकधूक | TET Exam Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET exam

शिक्षक पदासाठी अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या 'त्या' उमेदवारांना धाकधूक

मुंबई : टीईटी परीक्षा (TET Exam) नंतर शिक्षक पात्रता परीक्षेत यशस्वी होउन प्रत्यक्ष संस्थान वरून मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षक होण्यासाठीचा सर्व टप्पा पार पडलेल्या 2 हजार 65 शिक्षक उमेदवारांना (Teachers in trouble) सध्या सुरू असलेल्या टीईटी घोटाळ्यांमुळे (TET Scam) धाकधूक वाढली आहे. यातील बहुतांश उमेदवार हे मागील दोन वर्षांपूर्वीचे असले तरी एकूणच प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेकांचे स्वप्न अपुरे राहण्याची भीती शिक्षक उमेदवारांमध्ये (Teachers candidates fear) व्यक्त केली जात आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून मागील दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरतीनंतर राज्यातील विविध शाळांवर तब्बल 3 हजार 902 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी 2 हजार 65 शिक्षक उमेदवाराची निवड होऊन त्यांची संस्थास्तरावर प्रक्रियाही नुकतीच पूर्ण झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने 2 सप्टेंबर 2021 रोजी एक आदेश देऊन निवड करण्यात आलेल्या सर्व 2 हजार 65 शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन मुलाखती देत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

यासाठी प्रत्येक उमेदवारांना तब्बल 15 हजारहून अधिक प्राधान्यक्रम देण्यात आला होता. यामुळे प्रत्येक उमेदवारांना सुमारे दहा संस्थांवर मुलाखती देऊन त्यांना पात्र होण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही सर्व प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यातील अनेक शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित शिक्षक उमेदवारांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाने नुकतेच नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे स्टेटस पाहण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना चार्ट उपलब्ध करून देत त्यावर ही माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात सध्या टीईटी परीक्षा आणि एकुणच राज्य परीक्षा परिषद वादात सापडली असल्याने, राज्यातील विविध संस्थांवर शिक्षक म्हणून जाण्यासाठी तयार असलेल्या या शिक्षक उमेदवारांना आपल्या निवड आणि नियुक्तीचे काय होईल असा प्रश्न पडला आहे. या परीक्षा परिषदेचा गैरकारभार चव्हाट्यावर आल्याने मागील दोन वर्षांपूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बहुतांश उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर ही शंका उत्पन्न होऊ शकते, असे शिक्षण विभागातील एका अधिकारी सूत्राने सांगितले.

तर दुसरीकडे याचा कोणताही फरक पडणार नाही, यातील सर्व उमेदवार हे टीईटी आणि त्यानंतर घेण्यात पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, शिवाय अनेकांची नावे आता पवित्र पोर्टलवर आली असून अनेकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत. यामुळे सध्या सुरू असलेल्या चौकशीचा कोणताही परिणाम या प्रक्रियेवर होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले

टॅग्स :TET Exameducation update