esakal | केंद्रीय वायुसेनेच्या निवड मंडळाकडून 'IAF Group X-Y'ची सिलेक्शन यादी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Air Force

वायुसेनेतील भरती परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी!

केंद्रीय वायुसेनेच्या निवड मंडळाकडून 'IAF Group X-Y'ची सिलेक्शन यादी जाहीर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

IAF Group X & Y Select List 2021 : वायुसेनेतील भरती परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी! सेंट्रल एअरफोर्स सिलेक्शन बोर्डने (Central Air Force Selection Board) (सीएएसबी) नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत ग्रुप X आणि ग्रुप Y प्रकारात निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. सोमवार, 31 मे रोजी ग्रुप X आणि ग्रुप Y ची यादी मंडळाने airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. मात्र, सीएएसबीने जाहीर केलेली ग्रुप X आणि ग्रुप Y ची निवड यादी ही तात्पुरती स्वरुपाची आहे. या उमेदवारांची नावे पूर्णपणे रिक्त पदे, मेडिकल फिटनेस, वयोमर्यादा अटी आणि अस्थायी निवड यादीच्या (पीएसएल) वैधतेवर अवलंबून आहे. (The Central Air Force Selection Board Has Announced The Select List of IAF Group X And Y)

सीएएसबीने जाहीर केलेल्या नोटिसीनुसार, निवड यादीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांची निवड झाली असली, तरी ती अद्याप ग्राह्य नाही. कारण, रिक्त पदांच्या संख्येवर आणि इतर अटींवर ती निवड होणार आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांची नावे निवड चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही निवड यादीमध्ये समाविष्ट केली गेली नाहीत, त्यांची गुणवत्ता खाली नोंदविण्यात आली आहे. ते पीएसएलमध्ये जाण्यात अपयशी ठरले असल्याने त्यांची यादीत नोंद होऊ शकली नाही. तसेच पुढील निवड प्रक्रियेसाठी या उमेदवारांची उमेदवारी स्वयंचलितपणे संपुष्टात येईल. त्यामुळे या उमेदवारांना आता नव्या भरतीत नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

हेही वाचा: Spices बोर्डाची रायबरेली, मुंबईसह 'या' प्रयोगशाळांत भरती; 'असा' करा ईमेलद्वारे अर्ज

इनरोलमेंट लिस्ट 10 जुलै रोजी होणार जाहीर

दुसरीकडे, केंद्रीय वायू सेना निवड मंडळाने (सीएएसबी) 02/2021 च्या गटातील ग्रुप X आणि ग्रुप Y वर्गवारीत दाखल झालेल्या उमेदवारांची यादी 10 जुलै 2021 रोजी जाहीर करण्याची घोषणा केलीय. तसेच या उमेदवारांना आवश्यक त्या सूचनाही यादीसह देण्यात येतील. तथापि, पीएसएलच्या सर्व उमेदवारांना भरतीसंदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहनही मंडळाने केले आहे.

The Central Air Force Selection Board Has Announced The Select List of IAF Group X And Y