esakal | शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोंदणीची पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam

शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोंदणीची पाच सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
टीम इसकाळ

सातारा: दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत पाच सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यभरात १० ऑक्टोबरला होणार असून, या परीक्षेची जिल्हास्तरीय प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

हेही वाचा: देशभरात जेईई ॲडव्हान्स्डची 3 ऑक्‍टोबरला होणार परीक्षा

राज्यात २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, तर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही परीक्षा झाली नव्हती. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता द्यावी, यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जात होती. राज्य सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलल्याने शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख १० ऑक्टोबर निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या शिक्षकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पात्रता परीक्षेसाठी साधारण सात लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. मात्र, सन २०१८-१९ नंतर २०२१ मध्ये परीक्षा होणार असल्याने हा आकडा वाढणार असल्याची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तविली जात आहे.

हेही वाचा: पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

दरम्यान, या परीक्षेसाठी जिल्हास्तरावर नियोजन सुरू असून, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र शिक्षक पात्रतेची पहिलीच परीक्षा होणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवून परीक्षा होणार आहे. याचबरोबर, परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत २५ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही मुदत वाढविण्यात आली आहे. या परीक्षेसाठी दोन पेपर होणार असून, १२ ते २० च्या मर्यादेत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी केंद्रनिश्‍चिती करण्याची प्रक्रिया येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

loading image
go to top