esakal | CS परीक्षा नियोजित वेळेत होणार; आयसीएसआयच्या सचिवांची मोठी घोषणा

बोलून बातमी शोधा

CS

CS परीक्षा नियोजित वेळेत होणार; आयसीएसआयच्या सचिवांची मोठी घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : ICSI CS Exam 2021 : कोविडच्या महामारीमुळे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांमधील परीक्षा एकतर रद्द अथवा पुढे ढकल्या जात असल्या, तरी भारतीय संस्था सचिवांनी (आयसीएसआय) सर्व विद्यार्थ्यांना असे सूचित केले आहे, की जून 2021 मधील प्रस्तावित सीएस परीक्षा पूर्वनिर्धारित वेळेत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. गुरुवार 22 एप्रिल 2021 रोजी संस्थेने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेनुसार, आयसीएसआय ही कोविड साथीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, शिवाय या संदर्भातील सर्व आवश्यक उपाययोजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठेवावी - आयसीएसआय

संस्थेच्या घोषणेनुसार, अशा साथीच्या रोगापुढे विद्यार्थ्यांनी आपला संयम ढासळू देता कामा नये, याच काळात विद्यार्थ्यांनी अशा संकटाचा धैर्याने सामना करावा. या शिवाय सरकारने जारी केलेल्या साथीच्या रोगासंदर्भातील सूचना पाळत रहाव्यात. तसेच, आम्ही तुम्हाला आपल्या परीक्षांची तयारी सुरू ठेवण्यासाठी, आपला वेळ पुरेपूर वापरण्यासाठी आणि अभ्यासात अधिकाधिक वेळ व्यतीत करण्याचे आवाहन करतो."

BEL Recruitment : देशभरातील 'या' राज्यांत 'बीईएल'कडून 268 जागांसाठी मोठी भरती

प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा

आयसीएसआयने आपल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे, की संस्था सर्व जबाबदाऱ्या आपल्यावर घेत विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहे. यासह संस्थेच्या सचिवांनी परीक्षा जून -2021 च्या पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सीएस परीक्षा जून 2021 : अभ्यास साहित्य, प्रश्नपत्रिका आणि मार्गदर्शन

या घोषणेबरोबरच आयसीएसआयने पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य, मागील प्रश्नपत्रिका आणि संस्थेने तयार केलेल्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी मदत घेऊ शकतात याची माहिती दिली. या सर्व बाबींचा अभ्यास संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी विभागाच्या शैक्षणिक पोर्टलवर उपलब्ध आहे.