- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
रिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसते; योग्य मार्गदर्शन आणि मेन्टॉरशिपचीही तितकीच गरज असते. सुरवातीपासूनच अनुभवी मार्गदर्शकाची साथ मिळाल्यास, तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य दिशा मिळते आणि अनेक अडचणी सहज पार करता येतात.
विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक निवडी त्यांचं भविष्य घडवतात. मात्र, योग्य माहिती आणि अनुभवाअभावी अनेकदा विद्यार्थी गोंधळतात, चुकीचे निर्णय घेतात आणि नंतर पश्चात्ताप करावा लागतो. यासाठीच ‘करिअर मेन्टॉरशिप’ किंवा योग्य मार्गदर्शनाची भूमिका महत्त्वाची ठरते, विशेषतः करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यावर.