भारतीय तटरक्षक दलात गट-सी पदांची भरती! दहावी उत्तीर्णांना संधी

भारतीय तटरक्षक दलात गट-सी पदांची भरती! दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी
Indian_Coast_Guard
Indian_Coast_GuardSakal
Summary

भारतीय तटरक्षक दलाने गट 'क' पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : भारतीय तटरक्षक दलात म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड (Indian Coast Guard - ICG) मध्ये सरकारी नोकरी (Government job) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी. भारतीय तटरक्षक दलाने गट 'क' पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या कोलकाता मुख्यालयाने सिव्हिलियन एमटी ड्रायव्हर (सामान्य श्रेणी), फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर / एमटी (मेकॅनिकल), फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार) आणि लष्करच्या 18 पदांसाठी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

असा करा अर्ज

भारतीय तटरक्षक गट सी भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

Indian_Coast_Guard
'प्राथमिक' शिक्षकांना दिवाळीची 16 दिवसच सुटी! 'माध्यमिक'ला 20 दिवस

भारतीय तटरक्षक गट सी पदांसाठी पात्रतेचे निकष

  • सिव्हिलियन एमटी ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) : 10वी पास, जड आणि हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना. मोटार चालविण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव. मोटर यंत्रणेचे ज्ञान (किरकोळ समस्या हाताळण्यास सक्षम). वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे.

  • फोर्क लिफ्ट ऑपरेटर : ITI किंवा संबंधित ट्रेडमधील समतुल्य पात्रता किंवा ज्या ट्रेडसाठी ITI प्रशिक्षण घेतले नसल्यास त्यांच्यासाठी तीन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव. जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना. दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजीचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे.

  • एमटी फिटर / एमटी (मेकॅनिकल) : दहावी पास किंवा समकक्ष पात्रता. ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये दोन वर्षांचा अनुभव. संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे.

  • फायरमन : दहावी पास किंवा समकक्ष पात्रता. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्‍यक आहे. उंची किमान 165 सेमी. छाती कमीतकमी 81.5 सेमी आणि विस्तारासह 85 सेमी. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे.

  • इंजिन ड्रायव्हर : शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून इंजिन ड्रायव्हर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे.

  • मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार) : दहावी पास किंवा समकक्ष पात्रता. मान्यताप्राप्त संस्थेत चौकीदार म्हणून दोन वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे.

  • लष्कर : दहावी पास किंवा समकक्ष पात्रता. संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com