Synergy of Knowledge and Arts
sakal
- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
उज्जैनजवळ सांदीपनी आश्रम आहे. म्हणजे जिथे कृष्ण आणि सुदाम शिकले ती जागा. आता तिथे एक छानसं संग्रहालय उभं केलं आहे. काय आहे या संग्रहालयात? तर प्राचीन काळापासून भारतात प्रचलित असलेल्या १४ विद्या आणि ६४ कला यांच्याबद्दलच हे संग्रहालय आहे. तिथे प्रत्येक विद्या त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्ञानाच्या उपशाखा या सर्वांची विस्तृत माहिती दिलेली आहे.