- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘निवृत्ती, तू कितवीपर्यंत शिकलास?’ तो जरा लाजलाच. कसनुसा हासला आणि म्हणाला ‘काय सांगू?, फक्त एकच दिवस पाचवीत गेल्तो, मास्तरनी एक जोरदार उभी पट्टी हातावर मार्ली, जे शाळाबाहेर पल्डो, त्ये परत गेल्लोच नाही.’ आणि तो एकदम शांत झाला. निवृत्तीने आमचे शेत सध्या कसायला घेतले आहे. त्याची एक कायम तक्रार, ‘वावराकडं यावं, चक्कर मारावी. तुम्ही तर येतच नाही.’