युनियन बॅंकेत सरकारी नोकरीची संधी! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

युनियन बॅंकेत सरकारी नोकरीची संधी! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरती
युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरतीCanva
Summary

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी युनियन बॅंक ऑफ इंडिया (UBI) यामध्ये सरकारी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी युनियन बॅंक ऑफ इंडिया (UBI) (Union Bank of India) यामध्ये सरकारी नोकरीची (Government job) संधी आहे. यूबीआयने विविध विभागांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदांवर विशेष अधिकारी म्हणून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, एकूण 347 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार यूबीआयच्या अधिकृत unionbankofindia.co.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 3 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांकडे केवळ चार-पाच दिवसांचाच अवधी राहिला आहे.

युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरती
AAI मध्ये सिनिअर असिस्टंट पदांची भरती! 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

पदनिहाय रिक्त पदांची संख्या

  • सिनिअर मॅनेजर (रिस्क) - 60 पदे

  • मॅनेजर (रिस्क) - 60 पदे

  • मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) - 7 पदे

  • मॅनेजर (आर्किटेक्‍ट) - 7 पदे

  • मॅनेजर (इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर) - 2 पदे

  • मॅनेजर (प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजिस्ट) - 1 पद

  • मॅनेजर (फॉरेक्‍स) - 50 पदे

  • मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट) - 14 पदे

  • असिस्टंट मॅनेजर (टेक्‍निकल ऑफिसर) - 26 पदे

  • असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्‍स) - 120 पदे

जाणून घ्या पात्रता

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधारक आणि MBA / PGDBM किंवा अभियांत्रिकी पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. तसेच, व्यवस्थापक पदासाठी संबंधित ट्रेड / विषय किंवा या क्षेत्रात पदवी किंवा पीजी असणे आवश्‍यक आहे आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी सीए, सीएफए, सीएस किंवा एमबीए किमान 5 वर्षांचा अनुभव. उमेदवारांचे वय वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 30 ते 40 वर्षे, व्यवस्थापक पदासाठी 25 ते 35 वर्षे आणि सहाय्यक व्यवस्थापकासाठी 20 ते 30 वर्षे असावे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com