esakal | नोकरीची संधी! NABARD मध्ये 162 जागांसाठी लवकरच भरती
sakal

बोलून बातमी शोधा

NABARD Grade A Recruitment

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट लवकरच 'ग्रेड A आणि ग्रेड B'मधील रिक्त जागा भरण्याच्या तयारीत आहे.

नोकरीची संधी! NABARD मध्ये 162 जागांसाठी लवकरच भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

NABARD Grade A Recruitment 2021 : नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture & Rural Development, NABARD) लवकरच 'ग्रेड A आणि ग्रेड B'मधील रिक्त जागा भरण्याच्या तयारीत आहे. त्याअंतर्गत ग्रेडमधील सहाय्यक व्यवस्थापक आणि ग्रेड B मधील व्यवस्थापक या पदांसाठी लवकरच नेमणुकाही करणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 162 पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, याबाबत NABARD ने अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. दरम्यान, उमेदवारांना याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला nabard.org भेट द्यावी लागेल. (Recruitment For 162 Posts In National Bank For Agriculture And Rural Development Soon Job News bam92)

या तारखा लक्षात ठेवा..

  • ऑनलाइन अर्ज जमा करण्यासाठी प्रारंभ - 17 जुलै 2021 (तात्पुरती)

  • ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021 (तात्पुरती)

  • NABARD सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A परीक्षेची तारीख - जाहीर केली जाईल.

  • नाबार्ड व्यवस्थापक ग्रेड B परीक्षेची तारीख - जाहीर केली जाईल.

रिक्त जागा

  • सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी अ (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) - 148 पदे

  • सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (राजभाषा सेवा) - 5 पदे

  • सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा) - 2 पदे

  • व्यवस्थापक ग्रेड ब (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) - 7 पदे

हेही वाचा: खुशखबर! BSF मध्ये 285 जागांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार नाबार्ड ग्रेड A च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2021 पासून सुरू होऊ शकते. त्याचबरोबर या पदांच्या अर्जाची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2021 असू शकते. अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, की अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि मगच, पदासाठी सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करायला हवेत.

Recruitment For 162 Posts In National Bank For Agriculture And Rural Development Soon Job News bam92

loading image