आता हिंदीतून MBA डिग्री मिळवणं शक्य, भारतातील 'या' टॉप विद्यापीठात आहे ही सोय

टीम ईसकाळ
Saturday, 20 February 2021

आता लहानपणापासून हिंदी  माध्यमात शिकलेले, इंग्रजीतून शिक्षण घेण्यास अडचण असणारे सर्व देखील एमबीएची डिग्री घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अशा विद्यापीठांबद्दल आपण जाणून  घेणार आहोत, ज्या ठिकाणी मॅनेजमेंटसारखे विषय देखील हिंदीतून शिकता येतात.

देशात बहुतांश विद्यापीठात तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये  प्रोफेशनल कोर्सेस हे इंग्रजी भाषेमध्येच शिकवले जातात. जगभरात या विषयांची पुस्तके, अभ्यासासाठी लागणारे इतर साधने त्याच भाषेत उपलब्ध असल्याने बहुतेक ठिकाणी इंग्रजी भाषेतून हे शिक्षण दिले जाते. बऱ्याचदा या प्रोफेशनल विषयांच्या परीक्षा इंग्रजी  किंवा हिंदीत देण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना असते. उत्तर भारतात बरेच विद्यार्थी हिंदी भाषेतच परीक्षेला सामोरे जातात. पण उच्च शिक्षण घेत असताना प्रोफेशनल डिग्री कोर्सेसमध्ये मात्र तो पर्याय त्यांना दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतच परीक्षा द्यावी लागते. 

दरम्यान काही विद्यार्थी हे फक्त इंग्रजी भाषा जमत नाही या कारणामुळे ते प्रोफेशनल कोर्सेसना एडमिशन घेऊ शकत नाहीत. ते अशा आभ्यासक्रमांपासून इच्छा असून देखील दूर पळायला लागतात. सध्या एमबीए डिग्रीचे महत्व वाढत आहे. एमबीए प्रोफेशन्ल्स यांना सर्वत्र मागणी आहे. त्यामुळे या कोर्सकडे विद्यार्थ्यांचा कल देखील वाढताना दिसत आहे. आता लहानपणापासून हिंदी  माध्यमात शिकलेले, इंग्रजीतून शिक्षण घेण्यास अडचण असणारे सर्व देखील एमबीएची डिग्री घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अशा विद्यापीठांबद्दल आपण जाणून  घेणार आहोत, ज्या ठिकाणी मॅनेजमेंटसारखे विषय देखील हिंदीतून शिकता येतात.

महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी यूनिव्हर्सिटी

हे विद्यापीठ गुजरातमध्ये आहे. पण या ठिकाणी डिस्टंस लर्निंगद्वारे विद्यार्थी हिंदी भाषा माध्यमातून एमबीए करु शकतात. एमबीए एडमिशनसाठी एप्रिल-जून दरम्यानच्या काळात अधिसूचना काढण्यात येते. त्यानंतर नव्या वर्षात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या विद्यापीठात एमबीए आणि इतरही बरेच कोर्सेस शिकवले जातात. 

बनारस हिंदू यूनिव्हर्सिटी

उत्तर प्रदेशातील वारणसी येथील प्रसिध्द आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बनारस हिंदू विद्यापीठकडून देखील हिंदी भाषेत रेग्युलर एमबीएची डिग्री दिली जाते. या विद्यापीठात एडमिशन घेण्यासाठी दरवर्षी मार्च-एप्रिल दरम्यान फॉर्म मागवण्यात येतात. विद्यापीठाकडून एमबीएच्या इच्छूक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येते. ही प्रवेश परीक्षा परीशक्षा मार्च-मे च्या दरम्यान घेण्यात येते. 

पात्रतेच्या अटी काय आहेत?

एमबीए एडमिशन फॉर्म भरण्यासाठी  विद्यार्थ्यांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीतकमी ५५ टक्के गुण असलेली ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे.या दोन मुख्य विद्यापीठांखेरीज मुंबई विद्यापीठ, स्वास्ती विद्यापीठ इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी या ठिकाणी देखील हिंदी मीडियममध्ये एमबीए करण्याची सोय उपलब्ध आहे.  याविषयची अधिकची माहिती विद्यार्थी या विद्यापीठांच्या अधिकृत वेबसाईटवरुन देखील मिळवू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are the best universities of India having MBA through Hindi medium Marathi article