esakal | भारतामध्ये सायन्स शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असलेले करिअरचे ऑप्शन

बोलून बातमी शोधा

these are some Career options for 12th pass students in Science Marathi article

भारतामध्ये बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिवाय अनेक करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या लेखाद्वारे 12 वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी कोणकोणत्या डिग्री कोर्सला प्रवेश घेऊ शकतात याबाबतची माहिती देत आहोत.

भारतामध्ये सायन्स शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असलेले करिअरचे ऑप्शन

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : भारतामध्ये बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिवाय अनेक करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या लेखाद्वारे 12 वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी कोणकोणत्या डिग्री कोर्सला प्रवेश घेऊ शकतात याबाबतची माहिती देत आहोत.

मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस,

बारावी सायन्स नंतर इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अनेक तीन वर्षाचे रेगुलर ग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्स देशातल्या बहुतांश सर्व युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. हे कोर्स नियमित शिक्षण पद्धतीमध्ये असतात.   तुम्हाला एखाद्या विषयात ऑनर्स करावे लागते. याअंतर्गत तुम्हाला थेरी बरोबरच प्रॅक्टिकलचे ही मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग दिले जाते. मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यासाठी असलेले विशेष अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस पुढीलप्रमाणे

बीएससी आईटी
बीएससी कंप्यूटर साइंस
बीएससी केमेस्ट्री
बीएससी मैथेमेटिक्स
बीएससी फिजिक्स
बीएससी होटल मैनेजमेंट
बीएससी नौटिकल साइंस
बीएससी इलेक्ट्रानिक्स
बीएससी इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन

सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरचे ऑप्शन्स आहेत. पीसीबी किंवा पीसीएमबी ग्रुप चे स्टुडन्ट अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलचे विविध अभ्यासक्रम निवडू शकतात. अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला विद्यार्थी एमबीबीएस निवड करू शकतात एमबीबीएस हा एक देशात अत्यंत लोकप्रिय मेडिकल कोर्स आहे. याशिवाय विद्यार्थी अन्य अंडर ग्रॅज्युएट
  

मेडिकल कोर्सची निवड करू शकतात जसे की
बीडीएस (दंत चिकत्सा)
बीएएमएस (आयुर्वेद)
बीएचएमएस (होम्योपैथी)
बी.फार्मा (फार्मेसी)
बीपीटी (फिजियोथेरेपी)
बम्स (यूनानी चिकित्सा)
बीएएसएलपी (ऑडियोलॉजी और स्पीच-लैंग्वेज थेरेपी)
भारतामध्ये सायन्स शाखेकडील विद्यार्थ्यांसाठी करिअर स्कोप

भारतामध्ये दहावीनंतर सायन्स शाखेकडे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक लोकप्रिय आणि त्यांना आवडणाऱ्या करिअरचा समावेश असतो. या शाखेमध्ये लोकप्रियता या कारणासाठी आहे की यातून भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक आकर्षक संधी  उपलब्ध होतात. हायस्कूलमध्ये विज्ञान शाखा निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरसाठी अनेक  पर्याय उपलब्ध असतात. त्याच बरोबर पुढे जाऊन कोणत्याही दुसऱ्या शाखेचा अभ्यास ते करू शकतात आणि कोणत्याही क्षेत्रात ते आपले करिअर घडू शकतात.

मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी
जेव्हा करीयर बाबत  पर्यायाचा विचार सुरु होतो त्यावेळी मॅथ्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांना अनेक मोठे फायदे असतात. आपल्या कोर्सच्या आधारे ते इंजिनियर, सायंटिस्ट, वकील, सरकारी कर्मचारी, पायलट, फार्मासिस्ट, आर्किटेक्ट, शिक्षक, व्यवस्थापक, डिझायनर, कॉम्प्युटर तज्ञ असे काहीही होऊ शकतात.

बायोलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी
बायोलॉजी विभागातील  विद्यार्थ्यांना करियरसाठी अनेक पर्याय खुले असतात.  मुख्यता डॉक्टर सायंटिस्ट, दंतचिकित्सक, ऑर्थोडेंटिस्ट, फार्मासिस्ट, डॉक्टर ,नर्स याबरोबरच अन्य विषयाला ते प्रवेश घेऊ शकतात. या  विद्यार्थ्यांना शिक्षक, वकील, डिझायनर असे अन्य करिअरचे  पर्यायही निवडू शकतात.

सायन्स विषयाची लोकप्रियता
शैक्षणिक विश्वामध्ये सायन्स विभाग विद्यार्थ्यांना लोकप्रिय ठरले आहे. कारण हे विद्यार्थी अनेक रोमांचक आणि आकर्षक असे पर्याय त्यांना उपलब्ध असतात. बऱ्याचदा आई-वडील हे दहावी शिक्षणानंतर आपल्या विद्यार्थ्यांना सायन्स विभागाकडे जाण्यासाठी प्रेरित करत असतात. कारण ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हल ला प्रोफेशनल आणि सायंटिफिक कोर्स साठी प्रवेश घेणे यामध्ये अनिर्वाय असते. सायन्स  शाखेच्या विद्यार्थ्यांना खासकरून नैसर्गिक घटनेशी संबंधित विविध वस्तु आणि त्यातील पद्धतशीरपणे असलेली वैज्ञानिक अभ्यास त्याचबरोबर त्यांना यामध्ये प्रात्यक्षिके सुद्धा करावे लागते.

मुख्य विषय
सायन्स क्षेत्र हे एक विस्तृत आणि व्यापक आहे या अंतर्गत जवळपास सर्व गोष्टी समाविष्ट होतात, जे आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो, आपण जाणू शकतो. ज्या ठिकाणी आपण राहतो हीच फक्त दुनिया नाही तर हे एक संपूर्ण ब्रह्मांड सायन्सच्या आवाक्यामध्ये येते. खास करून विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या शिक्षणा वेळी प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचा अभ्यास करावा लागतो. याशिवाय एक सक्तीच्या भाषा विषयाचा पर्याय निवडावा लागतो. याशिवाय गणित हा एक विषय आहे जो आपण मुख्य विषय किंवा ऐच्छिक विषय सुद्धा ठेवू शकतो. वैज्ञानिक अभ्यासामध्ये सध्याच्या एकूण विज्ञानाची वाटचाल पाहता कॉम्प्युटर सायन्स हासुद्धा एक फाउंडेशन कोर्स म्हणून याअंतर्गत सध्या समाविष्ट झाला आहे.

फिजिक्स

हे एक नैसर्गिक विज्ञान आहे या अंतर्गत मुख्यता वस्तू आणि त्याची त्याचे भौतिक गुणधर्म याचा अभ्यास केला जातो याशिवाय या विषयाच्या माध्यमातून कशाप्रकारे ऊर्जा आणि दाब हे एक साथ एकाच वेळी काम करू शकतात हा विषय आपल्या भोवताली पसरलेल्या ब्रह्मांडाचा अभ्यास करतो.
फिजिक्स हे एक नैसर्गिक  विज्ञानाचा भाग आहे  जो विद्यार्थ्यांना सर्वात लहान अनु आणि परमाणु बरोबरच सर्वात मोठे चांदण्या आणि ब्रह्मांडाचे ही अभ्यास करण्याची संधी देते. अकरावी आणि बारावीच्या वर्गामध्ये फिजिक्स बरोबरच विजशास्त्र, खगोलशास्त्र, लहरी ध्वनी आणि प्रकाश याचाही अभ्यास केला जातो.

केमिस्ट्री
या विषयांमध्ये विविध पदार्थांचा अभ्यास केला जातो त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया मुळे ते कसे परिवर्तीत होतात हे सुद्धा केमिस्ट्री या विषयांमध्ये समजते. केमिस्ट्री मध्ये स्ट्रक्चर, कंपोझिशन, विहेवियर आणि प्रॉपर्टीज तसेच केमिकल रिएक्शन या माध्यमाने त्याच्या गुणांमध्ये कसे बदल होतहोता याचाही अभ्यास केला जातो. हा विषय फिजिक्स या विषयाशी सुसंगत असा आहे. या मध्ये फिजिक्स या विषयाचे अनेक कन्सेप्ट शिकवले जातात.

बायोलॉजी
या विषयांमध्ये जिवंत आणि मृत अशा दोन्ही जीवांचा अभ्यास केला जातो. यामध्ये जीवन आणि विभिन्न जीवित जीवांचा अभ्यास केला जातो. याचा मुख्य विषय पृथ्वीवरील विविध जीवसृष्टी, त्यांचा विकास, 
संरचना कार्य आणि . विभागणी ची प्रक्रिया समजून घेणे होय. 
बायलॉजी मध्ये तीन प्रमुख विषय विभाग पडतात
प्राणिशास्त्र : या शाखेमध्ये पशु संबंधित सर्व अभ्यास केला जातो त्यात त्याची रचना त्याचे शारीरिक विज्ञान याबाबत ही अभ्यास केला जातो
वनस्पती शास्त्र: वनस्पती शास्त्र अंतर्गत विविध वनस्पती आणि झाडांचा त्याचबरोबर त्याची संबंधित अन्य गोष्टींचा अभ्यास केला जातो.

मायक्रोबायोलॉजी

बायोलॉजी मधील ही एक अशी शाखा आहे या अंतर्गत सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. यात बॅक्टेरिया,व्हायरस अशा सूक्ष्मजीवांचा ही अभ्यास समावेश होतो.सायन्स विभाग विषयांची निवड सायन्स विभागांतर्गत विद्यार्थी दोन विभागाचे निवड करू शकतात

पीसीएम 
भौतिकशास्त्र (फिजिक्स)+ रसायनशास्त्र( केमिस्ट्री) गणित(मॅथ्स)
या विभागाला मॅथेमॅटिक्स ग्रुप ने जाणले जाते. या विषयाची निवड मुख्यता इंजिनीरिंग शाखेकडे जाण्यासाठी होते. जे विद्यार्थी अकरावी मध्ये हे विषय घेतात ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि त्या संबंधित विषयांचा अभ्यास तसेच एक भाषा विषय निवडतात.

पीसीएमबी
भौतिकशास्त्र (फिजिक्स)+ रसायनशास्त्र( केमिस्ट्री) गणित(मॅथ्स)+ जीवशास्त्र (बायोलॉजी)
पीसीएमबी ग्रुप ला बायोलॉजी ग्रुप असे मानले जाते आणि हा विषय तेच विद्यार्थी निवडतात ज्यांना मेडिकल अथवा त्या संबंधित अन्य विभागांमध्ये करिअर निवडायचे असते. हे ग्रुप घेणाऱ्यांना मुख्यता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स आणि त्याच बरोबर मायक्रोबायोलॉजी याचाही अभ्यास करावा लागतो. याचबरोबर अन्य अभ्यासक्रमात एक अनिर्वाय भाषा किंवा कॉम्प्युटर सायन्स अथवा आयटी हेसुद्धा शिकावे लागते.

विज्ञान विभागातील उच्च अभ्यासक्रमाची संधी
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अनेक बहुपर्यायी कोर्स तसेच करिअरची विस्तृत शृंखला उपलब्ध असते. सायन्स विभागातील  विद्यार्थ्यांना हा सर्वात मोठा फायदा होतो की ते पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट लेव्हल पर्यंत आर्ट्स किंवा कॉमर्स चा पर्यायही निवडू शकतात. परंतु अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन मध्ये सायन्स विभागातील विषय निवडता येत नाहीत. सायन्स विभागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगले करिअरचे पर्याय खालील प्रमाणे आहेत.

इंजिनीयर 
जे विद्यार्थी सायन्स विषय निवडतात  त्यांना इंजिनीयर  विषय अत्यंत लोकप्रिय असतो. दरवर्षी देशात सुमारे अकरा लाख विद्यार्थी सायन्स विभागातून इंजीनियरिंग प्रवेश परीक्षेसाठी बसतात यावरून या विषयाची असणारी लोकप्रियता स्पष्ट होते. इंजीनियरिंग विभागातून अनेक विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत शिकण्याची संधी मिळते याव्यतिरिक्त इंजीनियरिंग मधील अनेक वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये विद्यार्थी आपला  पर्याय निवडू शकतात या अंतर्गत
मैकेनिकल इंजीनियरिंग
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
सिविल इंजीनियरिंग
केमिकल इंजीनियरिंग
कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग
हे पर्याय आहेत 

मेडिकल ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर डिग्री कोर्स  बायलॉजी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनाही मेडिकल फील्ड मधील अनेक पर्याय उपलब्ध असतात ज्यामधून ते डिग्री करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयांमध्ये प्राविण्य मिळवणे अनिर्वाय ठरते. या कोर्सनंतर विद्यार्थी संशोधन क्षेत्रातही काम करू शकतात किंवा ते शिक्षक म्हणून हे आपले करियर बनवू शकतात.  मेडिकल ग्रुपमधील विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय असलेले बॅचलर डिग्री कोर्स खालील प्रमाणे आहेत.

बीएससी बायोकेमेस्ट्री
बीएससी बायोलॉजी
बीएससी एनवायरनमेंट साइंस
बीएससी बायोटेक्नोलॉजी
बीएससी नर्सिंग
बीएससी अक्यूपेशनल थेरेपी
बीएससी फिजियोथेरेपी
बीएससी रेडियोलोजी
बीएससी बायो इन्फॉर्मेटिक्स
बीएससी एन्थ्रोपोलॉजी
बीएससी माइक्रोबायोलॉजी
बीएससी जुलॉजी
बीएससी फोरेंसिक साइंस
बीएससी एग्रिकल्चर
बीएससी पैथोलॉजी
 

बिझनेस
बिझनेस अँड मॅनेजमेंट कोर्स आहे ज्याची निवड सायन्स विभागातील विद्यार्थी ही करू शकतात. या क्षेत्रामध्ये करिअर करून ते आपली गुणवत्ता आणि संधी वाढवू  शकतात. अनेक ग्रॅज्युएट लेव्हल चे बिझनेस मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत .ज्याची निवड ते आपापल्या सोयीप्रमाणे अथवा त्या विषयातील असणाऱ्या त्यांना रुची प्रमाणे करू शकतात. कोर्सेस खालील प्रमाणे आहेत

बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (बीबीए)
बैचलर ऑफ मैनेजमेंट स्टडीज़ (बीएमएस)
बैचलर ऑफ बिजनेस मैनेजमेंट (बीएमएम)
बैचलर ऑफ होटल मैनेजमेंट (बीएचएम)
इंटीग्रेटेड  बीबीए + एमबीए प्रोग्राम (5 साल)

विज्ञान व्यतिरिक्त बॅचलर डिग्री कोर्सेस 
सायन्स विभागातील विद्यार्थी सायन्स विषय शिवाय अन्य विषयाची डिग्री कोर्स निवडू शकतात.  विद्यार्थ्यांसाठी एक नवा मार्ग असतो कारण आर्ट्स कॉमर्स आणि अन्य संबंधित विषयांमधील प्रमुख प्रोफेशनल  कोर्स सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध  असतात. या क्षेत्रांमध्ये काही लोकप्रिय कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत.
बीकॉम (सांख्यिकी / गणित)
बीएसडब्ल्यू - सोशल वर्क
मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम
एनिमेशन और मल्टीमीडिया
इवेंट मैनेजमेंट

कायदा 
कायदा हा एक असा कोर्स आहे. जो बारावी सायन्स नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो. सायन्स विभागातील विद्यार्थी हा विषय ग्रॅज्युएशन लेव्हल पर्यंत घेऊ शकतात. इंटिग्रेटेड कोर्स सुद्धा त्यांना पर्याय असतो. परंतु अशा कॉलेजची संख्या अत्यंत कमी आहे आणि यामध्ये भविष्यात चांगली संधी असते. या अंतर्गत खालील पर्याय उपलब्ध आहेत.
बीएससी + एलएलबी
बीटेक. + एलएलबी
बीकॉम  + एलएलबी
बीबीए + एलएलबी

विद्यार्थी त्यांना आवडेल असे विषय कसे निवडावे अकरावी आणि बारावी सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी योग्य त्या विषयाची निवड करणे महत्त्वपूर्ण ठरते. या दरम्यान विद्यार्थी ज्या विषयाची निवड करतात त्याच्याच आधारावर ते पुढे अकॅडमी अभ्यास किंवा करिअर संबंधित निर्णय घेऊ शकतात. यासाठी योग्य विषय निवडणे विद्यार्थ्यांना आवश्यक असते. हे विषय निवडताना खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांची आवड 
विद्यार्थी नेहमी त्यांना ज्या विषयात रुची आहे अशाच विषयात अभ्यास करणे आणि त्यात आनंद घेत असतात.  कोणत्याही दबावाखाली न येता अथवा कोणी काय करत आहे  हे न पाहता आवडीच्या विषयाची निवड करावी. जर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स चांगले वाटत असेल आणि हे शिकत असताना तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्र खुणावत असेल तर  पीसीएम हाच ग्रुप तुमच्यासाठी चांगला ठरतो.

विद्यार्थ्यांनीच समजून घ्यावी आपली क्षमता आणि तुमच्यामध्ये असणारे कमकुवतपणा
आपल्या हिताच्या व्यतिरिक्त विद्यार्थी विषय निवडताना आपल्याकडे असणारी क्षमता आणि असणारा कमकुवतपणा याचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणात जर तुम्ही पीसीबी ची निवड केला आणि तुम्ही जर बायलॉजी मध्ये विशेष आवड दाखवत असाल परंतु दहावीच्या अभ्यासक्रम दरम्यान तुम्ही चांगले मार्क पाडला नाही तर अशा परिस्थितीत तुमची निवड योग्य होऊ शकत नाही. कारण पुढे जाऊन तुम्हाला यासाठी एक तर खूप कष्ट करुन  अभ्यास करावा लागेल किंवा तुम्हाला हा विषय न समजल्यामुळे भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.