Career Tips : आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय आहेत करिअर ऑप्शन्स? जाणून घ्या सविस्तर

जर तुम्हाला कला क्षेत्राची आवड असेल आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुमच्यासाठी कला क्षेत्र हे एकदम परफेक्ट आहे.
Career Tips
Career Tipsesakal

Career Tips : जर तुम्हाला कला क्षेत्राची आवड असेल आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुमच्यासाठी कला क्षेत्र हे एकदम परफेक्ट आहे. १२ वी नंतर कला या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील.

१२ वी नंतर कला या क्षेत्रात तुम्ही साहित्य, कला, सामाजिक विज्ञान, तत्वज्ञान आणि भूगोल इत्यादी विषयांमध्ये करिअर करू शकता. चला तर मग आज आपण या क्षेत्रातील काही हटके करिअर ऑप्शन्सबद्दल जाणून घेऊयात.

Career Tips
Career Tips : मेकअप आर्टिस्टचे क्षेत्र निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

बॅचलर ऑफ सोशल वर्क

बॅचलर ऑफ सोशल वर्क हा ग्रॅज्युएशन लेव्हलचा कोर्स आहे. जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. समाजातील प्रश्न सोडवणे, समाजात सुधारणा घडवून आणणे आणि सामाजिक न्यायाला चालना देणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ही पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी सामाजिक सेवा प्रदान करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करू शकतात. तुम्हाला समाजातील विविध वयोगटांमध्ये जसे की, लहान मुले, तरूण, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळते.

इंटेरिअर डिझायनिंग डिप्लोमा

मागील काही वर्षांपासून इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शिवाय, अनेक नवनवीन संकल्पना आणि डिझाईन्सची या क्षेत्रात भर पडत असून नागरिकांचा ही याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, इंटेरिअर डिझायनरला कामाच्या अमाप संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल आणि घर सजवायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही १२ वी नंतर इंटेरिअर डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकता. या डिप्लोमामध्ये विद्यार्थ्यांना घर, ऑफिस आणि व्यावसायिक जागांना आकर्षक आणि उपयुक्त बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान केली जातात. इंटेरिअर डिझायनिंगचे प्राथमिक ज्ञान, फर्निचर डिझायनिंग, आर्किटेक्चर स्किल्स इत्यादी कौशल्ये या डिप्लोमामध्ये शिकायला मिळतात.

फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा

आजकाल फॉरेन लॅंग्वेजला भरपूर मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतीय भाषांसोबतच आता परदेशी भाषांकडे देखील कल वाढताना दिसत आहे. शिवाय, अनेक आयटी कंपन्यांमध्ये फॉरेन लॅंग्वेज अवगत असलेल्यांना कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

१२ वी नंतर तुम्ही फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या कामाच्या संधी मिळू शकतील. हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही भाषा शिक्षक, अनुवादक म्हणून ही काम करू शकता.

Career Tips
Career Tips : जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com