
NTA ने निकालाची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर केलेली नसली तरी, लवकरच निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.
सोलापूर : NEET चा निकाल 2021 लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे, की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) NEET चा निकाल जाहीर करू शकते. वैद्यकीय इच्छुक उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहात आहेत. NTA ने निकालाची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर केलेली नसली तरी, लवकरच निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. 12 सप्टेंबर रोजी ही परीक्षा झाली होती आणि सुमारे 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा दिली होती. जाणून घ्या NEET निकालाशी संबंधित या खास गोष्टी.
NEET चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) nta.ac.in आणि neet.nta.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल. सप्टेंबरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार NEET चा निकाल तपासू शकतात आणि निकाल डाउनलोड करू शकतात.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) NEET निकाल 2021 साठी टॉपर लिस्ट जारी करेल. निकालासोबत टॉपर्सची यादी जाहीर केली जाईल.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA कधीही NEET निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) च्या वतीने, आरोग्य विज्ञान महासंचालनालय (DGHS) ऑल इंडिया कोटा (AIQ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि डीम्ड / सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या जागांसाठी NEET पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन समुपदेशन करेल.
उमेदवाराला मिळालेल्या गुणांवर आधारित NTA नंतर AIQ (ऑल इंडिया कोटा) द्वारे 15 टक्के जागांसाठी गुणवत्ता यादी तयार करते. यासह, एनटीए राज्य कोट्यातील उर्वरित 85 टक्के जागांच्या समुपदेशनासाठी सर्व राज्यांतील पात्र उमेदवारांची यादी संबंधित विभागाशी शेअर करते, ज्याच्या आधारे राज्ये त्यांची गुणवत्ता यादी तयार करतात.
NEET-UG 2021 परीक्षा भारतातील 83,075 वैद्यकीय, 26,949 दंत, 52,720 आयुष आणि 603 पशुवैद्यकीय जागांवर प्रवेश देण्यासाठी आयोजित केली जाते. NEET 2021 पात्रता कट-ऑफ पात्र ठरलेल्या उमेदवारांना NEET 2021 समुपदेशनात सहभागी होण्यासाठी बोलावले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.