Job Alert : कोरोना काळात 'या' नोकऱ्यांकडे वाढला कल, गुगल सर्चमध्ये स्पष्ट | Most Searched Jobs During Covid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Most Searched Jobs During Covid
Job Alert : कोरोना काळात 'या' नोकऱ्यांकडे वाढला कल, गुगल सर्चमध्ये स्पष्ट

कोरोना काळात 'या' नोकऱ्यांकडे वाढला कल, गुगल सर्चमध्ये स्पष्ट

कोरोनाकाळात गेल्या एक वर्षात लोकांच्या नोकरीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललला आहे. लोकांचा या काळात दुसऱ्यांना मदत करणे, पर्यटन, बांधकाम व्यावसायाकडे लोकांचा ओढा वाढला आहे. गुगल सर्च (Google Search) ने याबाबत खुलासा केला आहे. लोकांनी त्यांना जिथे बॉसला सामोरे जावे लागत नाही, अशा ठिकाणी नोकरी (Job Search) शोधण्याला प्राधान्य दिले असल्याचे यातून उघड झाले आहे. (Most Searched Jobs During Covid)

हेही वाचा: मॅट्रिमोनिअल साइटवर स्थळं शोधताय? प्रोफाइल बघण्यासाठी चार टिप्स फॉलो करा

या नोकऱ्यांकडे कल

जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान 'How to become' हा सर्च ट्रेंड जास्त चालला. आणि त्यात रिअल इस्टेट एजंट, फ्लाइट अटेंडंट, नोटरी, थेरेपिस्ट, पायलट, फायर फायटर, पर्सनल ट्रेनर, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिकल थेरपिस्ट आणि इलेक्ट्रिशियन हे पर्याय जास्त शोधले गेले.

हेही वाचा: रात्री मुली मोबाइलवर काय सर्च करतात? चार गोष्टी आहेत फेव्हरेट

मोठ्या संख्येने लोक देतात राजीनामे

कोरोना काळादरम्यान अनेक लोकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. अमेरिकामध्ये २०२१ हे वर्ष Great Resignation नावाने ओळखले गेले. या ट्रेंडवरून हे लक्षात आले की, जगभरातील लोकांना कोरोना काळात नोकरी सोडायची इच्छा होती. गुगलने (Google) सांगितले की लोकांनी या का काळात 'तुमची नोकरी कशी सोडायची'( How to Quit Your Job) ला जास्तीत जास्त सर्च केले. यात फिलिपींस, साऊथ आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणि युके मधील लोकांची संख्या जास्त होती. सर्च ट्रेंड एक्सपर्ट जेनिफर कुट्ज (Jennifer Kutz) यांनी सांगितले की, दर महिन्याला विक्रमी संख्येने लोकं नोकरी सोडत आहेत. यापैकी काहींनी कंपनीला फक्त दोन आठवड्यांची नोटीस दिली. काहींनी तर अचानक नोकरी सोडली.

हेही वाचा: आता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या टिप्स

Web Title: These Jobs Are Pleasing To The People During The Corona Revealed In Google Search

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top