काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!

काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच! उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात
काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!
काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!Canva
Summary

दरवर्षी शासकीय "आयटीआय'मधून अंदाजित चार हजार विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु, कौशल्याचा अभाव असल्याने त्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे.

सोलापूर : दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास 45 ते 55 हजार विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. दुसरीकडे शासकीय 'आयटीआय'मधून (ITI) अंदाजित चार हजार विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु, कौशल्याचा (Skill) अभाव असल्याने त्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जुन्याच मशिनरीवर प्रात्यक्षिकाचे धडे दिले जातात. काळ (तंत्रज्ञान) बदलला, तरीही कोर्स तेच असल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे उद्योजकांचे मत आहे.

काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये नॉन-एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती!

पदवी, पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार मिळावा, त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत म्हणून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा करून विद्यापीठात कौशल्य विकासाचे कोर्स सुरू केले. मात्र, बहुतेक विद्यार्थी केवळ प्रमाणपत्रासाठीच कोर्स पूर्ण करत असल्याचा अनुभव उद्योजकांना सांगितला. शिक्षण संस्थांनी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकावर भर द्यावा. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही कोर्समधून सखोल ज्ञान आत्मसात करावे. त्यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल, असा विश्‍वास उद्योजकांनी व्यक्‍त केला. पदवीनंतरही लाखो विद्यार्थी जॉबचा शोध घेत असतानाही दुसरीकडे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकासाच्या योजनेची घोषणा केली. परंतु, अजूनही ती योजना कागदाबाहेर आणली नाही. दुसरीकडे जिल्हा उद्योग केंद्रांनाही पुरेशा प्रमाणात निधी नसल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर वाढती बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'आयटीआय'मध्ये जुन्याच मशिनरीवर प्रात्यक्षिक

पारंपरिक शिक्षणातून पदवी घेऊनही जॉब मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला आहे. परंतु, शासकीय व खासगी "आयटीआय' आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना वेळोवेळी नव्या मशिनरी खरेदी करून द्यायला हव्यात. मात्र, मागील चार वर्षांत एकही नवीन मशिनरी खरेदी झालेली नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार व प्रवेश क्षमताही वाढलेली नाही, असे अकलूज (खंडाळी) येथील शासकीय आयटीआयचे प्राचार्य जोहर आवटे यांनी सांगितले. दहावीनंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणारी योजना आणल्यास निश्‍चितपणे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!
ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी

पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या अथवा आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव दिसून येतो. विद्यापीठात कौशल्य विकासाचे अनेक कोर्स सुरू झाले. परंतु, बहुतेक विद्यार्थी केवळ प्रमाणपत्रासाठीच तो कोर्स करतात. परंतु, मल्टिटॅलेंटेड विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे जॉब मिळतो. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.

- राम रेड्डी, अध्यक्ष, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com