ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी

ढीगभर झाले मंत्री, पण सोलापूर जिल्ह्यात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी
ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी
Updated on
Summary

जिल्ह्यात टेंभुर्णी, मोहोळ, चिंचोळी आणि शहरालगत अक्‍कलकोट रोड या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग सुरू आहेत.

सोलापूर : जिल्ह्याची लोकसंख्या (Population) 43 लाखांहून अधिक असून एकूण 11 तालुके आहेत. जिल्ह्याची सीमा जवळपास 750 चौरस किलोमीटर इतकी असून जिल्ह्यात 18 ते 30 वयोगटातील तरुणांची संख्या सहा लाखांपर्यंत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात (Cabinet) काही अपवाद वगळता जिल्ह्यातील नेत्यांना संधी मिळाली आहे. तरीही, भविष्याचा वेध घेऊन उच्चशिक्षितांच्या अपेक्षा व स्वप्न पूर्ण होतील असे उद्योग (Industry) सुरू करण्यासाठी कोणीही ठोस प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे बहुतेक तरुण उच्चशिक्षणानंतर स्थलांतर (Migration) करीत असल्याची स्थिती आहे.

ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी
वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!

जिल्ह्यात टेंभुर्णी, मोहोळ, चिंचोळी आणि शहरालगत अक्‍कलकोट रोड या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग सुरू आहेत. मात्र, ठराविक उद्योगच त्या ठिकाणी असल्याने विविध अभ्यासक्रमांतून उच्च शिक्षण घेतलेल्यांना त्या ठिकाणी जॉब करण्याची संधी मिळत नाही. चिंचोळी एमआयडीसीत पावणेचारशेपर्यंत तर अक्‍कलकोट रोड एमआयडीसीत लहान-मोठे साडेसातशेपर्यंत उद्योग सुरू आहेत. मोहोळ येथील औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून उद्योजकांना त्या ठिकाणी पायाभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत. दरम्यान, मागील दीड वर्षात चिंचोळी एमआयडीसीतील प्रिसिजन, वामसी, बालाजी अमाईन्स, स्मृती आरगॅनिक्‍ससह अन्य काही कंपन्यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार केला आहे. तर दुसरीकडे जवळपास 30 नव्या कंपन्यांची उभारणी सुरू असल्याचे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर जिल्ह्यात ऑटोमोबाईल कंपन्या, मग आपल्याकडे का येत नाहीत?

औद्योगिक विकासातून तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी जिल्ह्यात ऑटोमोबाईल कंपन्या येण्याची गरज आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आल्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य तयार करणाऱ्या जवळपास दीडशेहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या येऊ शकतात, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. टेल्को, महिंद्रा, बजाज, कल्याणी ग्रूपच्या कंपन्या अजुनही सोलापुरात आलेल्या नाहीत. कोल्हापूर, नागपूर, नगर, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी तशा कंपन्या आल्या, परंतु सोलापूर जिल्ह्यात एकही कंपनी आलेली नाही. तसा यशस्वी प्रयत्नही कोणी केल्याचे दिसत नाही. मागील कित्येक वर्षांपासून विमानसेवा सुरू करण्याचा प्रश्‍न रेंगाळलेलाच असून त्यावर कोणीच ठोस तोडगा काढू शकत नसल्याची स्थिती आहे.

ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी
नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

सोलापुरात विभागीय कार्यालयसुद्धा नाही

जिल्ह्यातील अनेक नेत्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले. मात्र, अपेक्षित औद्योगिक विकास होऊ शकला नाही, अशी टीका स्थलांतरीत उच्चशिक्षित तरुण करीत आहेत. सांगली, बारामती, पुणे, लातूर या ठिकाणी एमआयडीसीची विभागीय कार्यालये झाली. मात्र, सोलापूर जिल्ह्यात विभागीय कार्यालय सुरू होऊ शकले नाही. उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सांगलीसह अन्य ठिकाणी हेलपाटे मारावे लागल्याचाही अनुभव काहींनी सांगितला. आगामी काळात राजकीय नेत्यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात एमआयडीसीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय व्हावे, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्‍त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com