नाही म्हणायला शिका? ऑफिसमध्ये काही कामांना नकार देणं समजुतदारपणा

tips for office women in office any work say no to seniors in kolhapur
tips for office women in office any work say no to seniors in kolhapur

कोल्हापूर : साधारणतः बऱ्याच महिला ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी दबावाखाली राहतात. त्यांना नेहमी या गोष्टीची भीती असते की त्यांच्या परफॉर्मन्सला घेऊन कुणी त्यांच्या कामावर कमेंट किंवा कोणत्याही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. त्यामुळे महिलांना ऑफिसमध्ये कोणते काम दिले तर त्याला नाही म्हणने टाळतात. कामाचे प्रेशर असल्यामुळे एखादं काम त्यांच्याकडून चूक होऊ शकते. एखाद्या वेळेस कामाच्या प्रेशरमुळे त्यांचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो. अशी परिस्थिती कोणत्याही वर्किंग महिलेसाठी फायद्याची नाही. या परिस्थितीत तुम्हाला हे स्पष्ट झाले पाहिजे, की कोणत्या कामाला तुम्हाला नकार द्यायचा आहे, आणि कोणत्या कामाला तुम्हाला होकार द्यायचा आहे. 

जरुरी नसलेली कामे

आपल्या काही गैर महत्वपूर्ण कामांमुळे फक्त कंपनीलाच नाही तर आपल्या क्षमतेवरही प्रभाव पडत असतो. काही गैर जरूरी काम तुम्ही करत असाल तर सिनियर्सनाही त्या गोष्टीची सवय लागते. त्यांचे मत वेगळे होऊ शकते. या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही. मात्र तुमचे महत्त्वाचे काम आणि सीनियर आणि सिस्टीम दोघांनाही उपयोगी पडू शकते.

जे लक्ष्य पूर्ण होऊ शकणार नाही

तुम्हाला तुमच्या कामाचे सर्व लक्ष्य माहीत असले पाहिजेत. काय चुकीचे आहे, काय बरोबर आहे याची जाणीव असावी. कोणतीही गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे माहीत असवी जी तुमच्या पुढील वाटचालीसाठी नवीन दिशा देते. तसेच कष्ट करण्याची तयारी दाखवते. परंतु कोणतेही काम करण्यास तुम्हाला बोलले जात असेल किंवा जबाबदारीपेक्षा विरुद्ध काम दिले जात असेल तर अशा कामासाठीही नकार देता आला पाहिजे.

अनावश्यक मीटिंग

एका संशोधनानुसार असं पुढे आले आहे की, मीटिंग केल्यामुळे बऱ्याच गोष्टी हव्या तशा निकाल देउ शकत नाहीत. त्यामुळे वेळ वाया जातो. बऱ्याच मिटिंग  या अनावश्यक निकाल देतात. म्हणजे तुम्ही एखादी मिटींग अटेंड करणार असाल, पण जी तुमच्या कामाशी संबंधित नाहीये तर तुम्ही अशा मिटिंगना नकार दिला पाहिजे.
 
जे काम तत्त्वांना सोडून असेल

प्रत्येक व्यक्तीची खासियत वेगळी असते. काही लोक एखादं काम खूप सोप्या पद्धतीने करू शकतात आणि काही लोक ते स्वीकारूही शकत नाहीत. बरेच त्या पद्धतीने कामांना ज्या त्या मूल्यांमध्ये किंवा श्रेणीमध्ये ठेवतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की ऑफिसमध्ये तुम्हाला असे एखादे काम करावे लागते जे तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, तुमच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे, तर अशी कामे करायला तुम्ही नकार द्या. तुमच्या स्पष्ट नकार हा तुमच्या सिनियर्सना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले. जर तुमच्या नकाराने तुमच्या कामावरती किंवा नोकरीवरती काही परिणाम होणार असेल तर त्यांना तुम्ही अशी संकेत द्या किती काम करण्यासाठी मला प्रॉब्लेम येत आहे. अशावेळी तुम्ही नोकरीसाठी पर्याय शोधायला सुरुवात करा. ऑफिसमध्ये आत्मविश्वास सोबत तुम्ही काही नवीन शोधत असाल किंवा त्याचा प्रयत्न करत असाल, तर काही नवीन गोष्टी तुमच्या सोबत घडत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com