Exam Tips
Exam Tipsesakal

Exam Tips : परीक्षेसाठी 'असे' करा वर्षभराचे वेळापत्रक; कुटुंबीयांसह विद्यार्थ्यांना होईल फायदा

परीक्षा हा एकटा विद्यार्थी (Students) देत नसतो तर संपूर्ण कुटुंब परीक्षेला (Exam) सामोरे जात असते.
Summary

'विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विरंगुळा, विश्रांती व झोपेसाठी पुरेसा वेळ द्यावा, मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा, स्वसंमोहन, स्वयंसंदेश देण्याचा सराव करावा.'

-श्रुतिका कोतकुंडे सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

परीक्षा हा एकटा विद्यार्थी (Students) देत नसतो तर संपूर्ण कुटुंब परीक्षेला (Exam) सामोरे जात असते. त्यामुळे घरातील सदस्यांनी वातावरण खेळीमेळीचे ठेवावे. पालकांनी मुलाला अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळेल हे बघावे, अनाठायी सक्तीने वागू नये. मुलांची स्वतःशी अथवा इतर मुलांशी तुलना करणे टाळावे. मुलांविषयी सहानभूती व विश्वास ठेवून वागावे म्हणजे मुले तणावमुक्त वातावरणात जोमानी अभ्यास करतील व आनंदाने परीक्षेला समोरे जातील.

योग्य तयारीने परीक्षा उत्तमप्रकारे दिली जाऊ शकते. परीक्षेच्या तयारीत मुख्यतः मानसिक एकाग्रता, स्मृती व अभ्यास कौशल्ये महत्त्‍वाची ठरतात. परीक्षेबद्दल ताण वाटणे जरी स्वाभाविक असले तरी अनिवार्य नाही. परीक्षेतील सफलतेचे मुख्य घटक म्हणजे अभ्यास करण्यासाठी प्रेरणा, चिकाटीने अभ्यास करणे, वेळेचे व्यवस्थापन करणे, अभ्यासातील सातत्य टिकवणे, अभ्यासाची सुसूत्र तयारी करणे, ताणाचे व्यवस्थापन करणे, परीक्षेचे कौशल्य आत्मसात करणे यासाठी पालकांनी सुरुवातीपासून मुलांशी थोरामोठ्यांच्या आत्मचरित्रे, अनुभव कथन करावीत.

Exam Tips
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

अभ्यास कौशल्याबद्दल (Study Skills) माहिती घ्यावी, चर्चा करावी तसेच आपल्या मुलांची बलस्थाने आणि उणिवा समजून त्यांना अभ्यासात शिस्त आणण्यासाठी मदत करावी. हल्ली मोबाईलचा वापर अभ्यासासाठीही अनिवार्य झाला आहे तरी त्याचे व्यसन होणार नाही यासाठी मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, इतर छंद जोपासण्यास प्रवृत्त करावे. परीक्षेतले अपयश हेही काही ठराविक मुद्द्यांवर निर्भर करते. अभ्यासासाठी प्रेरणा नसणे, चिकाटी नसणे, सातत्य नसणे, काय वाचावे, कसे वाचावे याबद्दल स्पष्टता नसणे. अक्षर स्वच्छ नसणे, तणावग्रस्त होणे, परीक्षेची अपुरी तयारी, उत्तरात गरजेनुसार बदल करता न येणे, थोडक्यात आशय मांडता न येणे, वेळेचं व्यवस्थापन नसणे यासाठी पालकांनी सुरुवातीपासून मुलांच्या अभ्यासात रस घ्यावा, त्यांच्या शिक्षकांकडून मुलांच्या शैक्षणिक गरजा समजून मुलांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करावे.

Exam Tips
10th-12th Exam : परीक्षेचा स्ट्रेस, टेन्शन, भीती कशाला?

प्रत्येक मुलाची शिकण्याची एक शैली असते त्यामुळे खूप मोठे बदल शेवटच्या टप्प्यात करणे टाळावे. मुलांचे कमजोर विषय समजून त्यांना त्यासाठी क्लास, शिकवणी लावावी. सरसकट सर्व विषयांसाठी शिकवणी लावणे टाळावे अन्यथा मुलांवर अभ्यासाचे ओझे डोईजड होईल व मूल अभ्यासाचा तिटकारा करू लागेल. शिकवणी, क्लासमध्ये शिकवलेले कळते का ते वेळोवेळी तपासावे. मुलाचे व्यक्तिमत्त्‍व समजून हवा असल्यास आधार देत राहावा त्याच्याशी आपुलकीने संवाद साधतं राहावा. परीक्षेची तयारी वास्तविक वर्षाच्या सुरवातीलाच होत असते. मुलांनी वर्ग न बुडवता सर्व अभ्यास समजून करावा. टिपणे काढावीत व टिपणे तसेच संकल्पना तपासून घ्याव्यात. पाठ्यपुस्तके नियमित वाचावीत.

अभ्यासकौशल्यातील छोट्या-मोठ्या करामती वापरून संकल्पना लक्षात ठेवाव्यात. अभ्यासाबद्दल मित्रांसोबत चर्चा करावी. शिक्षकांबरोबर किंवा मित्रांबरोबर संकल्पना समजून घ्याव्यात. कठीण विषयांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. कठीण विषयाला पुरेसा वेळ द्यावा. अभ्यासक्रमातील ठराविक अभ्यास करणे टाळावे. यासाठी पालकांनी मुलासोबत संवाद वाढवावा त्यांच्यासोबत गंमतजंमत करायला वेळ द्यावा, सारखी उलटतपासणी करीत जाऊ नये. घरात हलकेफुलके वातावरण ठेवावे, खेळीमेळीचा संवाद ठेवायचा प्रयत्न करावा. मुलांना त्यांच्या मित्रांसोबत संवाद साधण्याची मुभा द्यावी. मुलाची संगत चांगली नाही, अशी शंका आल्यास त्याबद्दल मोकळा संवाद साधावा.

Exam Tips
Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विरंगुळा, विश्रांती व झोपेसाठी पुरेसा वेळ द्यावा, मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा, स्वसंमोहन, स्वयंसंदेश देण्याचा सराव करावा, पालक अथवा भावंडांशी परीक्षेच्या तयारीबद्दल चर्चा करावी यासाठी पालकांनी मुलांना विचारून हवी तशी मदत करावी. मुलांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. कुठलाही मोठा समारंभ, कार्यक्रम मुलांच्या अभ्यासाच्या आड येणार नाही हे बघावे. त्यांच्या आवडीचे पोषक जेवण बनवून त्यांना हवा तसा सहवास, संवाद साधल्याने मुलांना आधार वाटेल व ते वातावरणात अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतील. परीक्षेआधीच्या काही दिवसांमध्ये हे टाळावे.

नवे टिपण काढणे किंवा जमवणे, ते शेवटपर्यंत वाचत बसणे व उजळणीस वेळ न देणे. नवीन संकल्पना शिकण्याचा एकट्याने प्रयत्न करणे, बराच काळ विश्रांती न घेता अभ्यास करत बसणे, रात्रभर जागे राहून अभ्यास करणे, रात्री झोप उडवण्यासाठी चहा-कॉफी वारंवार घेऊन अभ्यास करणे, खूप तणाव आल्यामुळे अभ्यास करणेच सोडून देणे, पेपर फुटतोय का, याची वाट बघणे किंवा तसा प्रयत्न करणे, कॉपी करण्यासाठी मजकूर लिहित बसणे. पालकांनी मुलांना सारख्या सूचना करणे टाळावे. मुलांशी प्रेमाने, आपुलकीने बोलावे. परीक्षेची भीती कमी करावी. हा जीवनमरणाचा प्रश्न नाही, हे त्यांच्या मनावर ठसवावे. जो काही निकाल लागेल त्याला आपण एक कुटुंब म्हणून स्वीकारू आणि कुटुंब सदैव मुलांच्या पाठीशी आहे, याची जाणीव मुलांना करून द्यावी.

Exam Tips
भूलतज्ज्ञ नाथा : 'आयुष्यभर ओढलेल्या धुराने फुप्फुसे निकामी झालीयत, वर्षातून चार-पाचवेळा नाथा वेडसर होतो!'

परीक्षेच्या दिवशी हे करावे

पुरेशी झोप घ्यावी, हलका आहार घ्यावा. सर्व वस्तू घेतल्यात का ते तपासून बघणे. परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोचावे. परीक्षेचा पेपर मिळेपर्यंत लांब लांब श्वास घेऊन मन शांत करावे, प्रार्थना म्हणावी. यासाठी पालकांनी मुलाला हवे असल्यास परीक्षा केंद्रापर्यंत सोबत करावी. त्याला धीर द्यावा. हलकाफूलका संवाद करावा. पेपर मिळाल्यावर काय करावे, प्रश्नपत्रिका नीट वाचावी, शंका असल्यास त्याचे निरसन करून घ्यावे. जे प्रश्न सर्वात छान येतात ते प्रश्न आधी सोडवावेत. कठीण प्रश्न शेवटी सोडवावेत. महत्त्‍वाच्या टीपा अधोरेखित कराव्यात. उत्तरांना उगाच लांबण लावू नये. उत्तरांबरोबरच प्रमेय, आकृती, नकाशा, आलेख यांनाही महत्त्‍व द्यावे. पेपर किमान दहा मिनिटे आधी सोडवून संपवावा म्हणजे तपासून बघता येईल. पेपरसंदर्भात चर्चा त्याच दिवशी करणे टाळावे अन्यथा दुसऱ्या दिवसाच्या पेपरवर परिणाम होऊ शकतो.

(लेखिका मनोविकारतज्‍ज्ञ व मानसोपचारतज्‍ज्ञ आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com