Maharashtra Public Service Commission
Maharashtra Public Service Commissionesakal

MPSC Exam : स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक बदलले; वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना मोठा फटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Summary

मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्याने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने आरक्षणावर नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार आली.

रत्नागिरी : प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो युवक-युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोना पश्चात परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Elections) सर्वच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. त्याचा वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना फटका बसणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये २८ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, तर १९ मे रोजी होणाऱ्‍या समाजकल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे.

Maharashtra Public Service Commission
Police Recruitment : पोलिस भरतीसाठी SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग 'खुला'; शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला पर्याय

यूपीएससीमार्फत (UPSC) होणाऱ्‍या परीक्षादेखील पुढे गेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर जाहीर होणार आहेत. कोरोना काळात दोन वर्षे परीक्षा थांबल्याने अनेकांची संधी हुकली आहे. आताही परीक्षा पुढे गेल्याने परीक्षार्थींच्या अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. त्याचबरोबर या परीक्षांसाठी ठराविकच संधी व वयाची मर्यादा असते. वय वाढत गेल्याने जे परीक्षार्थी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत, अशांना परीक्षा पुढे गेल्याचा फटका बसणार आहे.

प्रशासकीय सेवेची क्रेझ युवा वर्गात वाढल्याने लाखो विद्यार्थी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे या परीक्षांमध्ये गुणवत्तेत चुरस वाढली आहे. त्यातच महामारी, पेपरफुटी, निवडणुका अशा कारणांनी परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने या विद्यार्थ्यांच्या यशात वयाचा अडसर निर्माण होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध राज्य तसेच केंद्रातील प्रशासकीय पदांसाठी परीक्षा घेण्यात येतात.

Maharashtra Public Service Commission
सातारा काँग्रेसला सोडल्यास लढू; 'या' बड्या नेत्यानं दर्शवली लोकसभा लढवण्याची तयारी, महायुतीसमोर आव्हान!

मात्र, मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्याने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने आरक्षणावर नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार आली. काही परीक्षांच्या निकालावर स्थगिती आल्याने संबंधित उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. रात्रीचा दिवस करत कठोर मेहनत घेणाऱ्‍या तरुणाईची जीवनात स्थिरावण्यासाठी रस्सीखेच सुरूच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com