
रिना भुतडा - करिअर समुपदेशक
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लेखाकर्म, करनिर्मिती, वित्तीय नियोजन व लेखापरीक्षण या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांची मागणी सतत वाढत आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात. यामध्ये प्रामुख्याने चार अभ्यासक्रम महत्त्वाचे मानले जातात. एसीसीए (असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट्स), यूएस सीपीए (युनायटेड स्टेट्स सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट), कॅनडा सीपीए (चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट ऑफ कॅनडा) आणि सीएमए (सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट). या सर्व अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये, पात्रता निकष, करिअर संधी आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत.