
Tribal Students Protest : वसतिगृहासंबंधीच्या समस्यांविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे : मुलींच्या वसतिगृहासाठीच्या इमारतीपासून ते प्रलंबित अनुदान देण्यापर्यंत विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. मांजरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवार (ता.१५) पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा करूनही मागण्या मान्य न झाल्याने विद्यार्थी उपोषणाला बसले असून, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. अर्ज प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, डीबीटीची प्रलंबीत रक्कम जमा करणे, जेवणाची सुविधा पुर्ववत चालू करणे, बार्टी, सारथी आणि महाज्योती प्रमाणेच टार्टीच्या योजना सुरू करणे, पीएचडी धारकांना अधिछात्रवृत्ती सुरू करणे, इंटर्नशिपच्या विद्यार्थ्यांना मानधन मिळावे, आदी मागण्यांसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले आहे. या संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांना संपर्क केले असता, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
कोट आदिवासी विद्यार्थ्यांना जेवनासाठी मिळणारी डीबीटी रक्कम वेळेत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होते. विद्यार्थ्यांनींच्या वसतिगृहाची क्षमता ५०० असतानाही २०० प्रवेश दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीना राहण्याची व्यवस्था होत नाही. मिळणारी डीबीटी DB रक्कमही पुरेशी नसते, त्यामुळे यात वाढ करावी किंवा पुर्वरत जेवण चालू करावे.
- महेंद्र भोये, विद्यार्थी, आदिवासी वसतिगृह मांजर