PhD Degree Alert: पीएचडी करणाऱ्यांनो सावध व्हा! या संस्थांमधून पीएचडी केल्यास डिग्री अमान्य; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PhD Degree Alert

PhD Degree Alert: पीएचडी करणाऱ्यांनो सावध व्हा! या संस्थांमधून पीएचडी केल्यास डिग्री अमान्य;

PhD Degree: पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय. यूनिवर्सिटी ग्रँट कमिशनने (UGC) ने आणि ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एजुकेशन इंस्टीट्यूट (AICTE)ने कलेल्या घोषणेनंतर आता परदेशी शैक्षणिक संस्थांच्या मदतीने अॅडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या ऑनलाइन पीएचडी अभ्यासक्रमांना (पीएचडी) मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

परत एकदा यूजीसीने विद्यार्थ्यांना सजग करत सांगितले आहे की अॅडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या ऑनलाइन पीएचडी कोर्सेसला मान्यता दिली जाणार नाही. यूजीसीने यावर ट्विट करत विद्यार्थ्यांना अॅडटेक कंपन्यांच्या अॅडवर जाऊ नका असा सल्ला दिलाय. तसेच विद्यार्थ्यांना याबाबत अधिक माहिती देणारी एक पोस्टही शेअर केली आहे.

यूजीसीने म्हटले आहे की पीएचडी पदवी प्रदान करणाऱ्या सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी यूजीसी आणि एआयसीटीईच्या संयुक्त आदेशानुसार, पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी यूजीसी मानदंडांचे पालन करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांसोबत होणारी फसवणुकीपासून टाळण्यासाठी यूजीसीने ही घोषणा केली आहे. अनेकदा हे अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नसतात.